राष्टॣमाता ईंदीरा गांधी न.प.विद्यालयाची विद्यार्थीनी कु.प्राची टवरे हिची राज्य स्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी निवड..

 

इस्माईल शेख बुलढाणा .जि. प्र.

शेगांव: राष्टॣमाता ईंदीरा गांधी न.प.विद्यालयाची विद्यार्थीनी कु.प्राची टवरे हिची राज्य स्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे . येथील राष्टॣमाता ईंदीरा गांधी नगर पालीका विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थीनी कु.प्राची अमोल टवरे हिने अमरावती येथे पार पडलेल्या विभागीय जिमनॅस्टिक स्पर्धेत रजत पदक पटकावून यश संपादन केले.

क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे विभागीय जिमनॅस्टिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

अभ्यासात अतीशय हुशार असलेल्या कु.प्राची टवरे हिने अमरावती येथे पार पडलेल्या विभागीय जिमनॅस्टिक स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. पुणे येथे 26 ते 29 नोव्हेंबर पर्यंत होणाऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी कु. प्राची अमोल टवरे हिची निवड झाली आहे.तीचे या यशाबद्दल अभिनंदन होत आहे

Leave a Comment