राहुलभैय्या लोणीकर यांच्या निवडीने मराठवाड्यात नवचैतन्य निर्माण झाले,ज्ञानेश्वर शेजुळ यांनी सेवली येथे व्यक्त केले गौरवोद्गार

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(जालना)भारतीय जनता युवा मोर्चाचे फायरब्रॅंड युवानेते,युवाह्रदयसम्राट मा.राहुलभैय्या लोणीकर यांची आज भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याने मराठवाड्यातील जनतेमध्ये विशेषःत नवतरुणामध्ये वनचैतन्य निर्माण झाल्याचे गौरवोद्गार भाजपाचे जालना जिल्हाउपाध्यक्ष,श्री.ज्ञानेश्वर (माऊली)शेजुळ यांनी आज सेवली येथे आनंदोत्सव साजरा करताना काढले आहे.उपमुख्यमंत्री मा.ना देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा प्रदेश अध्यक्ष,श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे व भाजपा प्रदेश महामंत्री मा.श्री.विक्रांतदादा पाटील यांच्य् उपस्थितीमध्ये आज भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे हि निवड जाहीर करण्यात आले.मा.राहुलभैय्या लोणीकरांच्या निवडीचे वृत्त समजताच सेवली सर्कलमधिल कार्यकर्त्यांंनी एकत्र येत फटाके वाजवुन व मिठाईचे वाटप करुन आंनंदोत्सव साजरा केला.यावेळी उपस्थितांशी व माध्यमांच्या प्रतिनिधिशी बोलताना श्रीज्ञानेश्वर शेजुळ यांनी वरील गौरवोद्गार काढले आहेत.पुढे बोलताना श्री.ज्ञानेश्वर शेजुळ म्हणाले की,मा.मंत्री तथा आमदार मा.श्री.बबनरावजी लोणीकरांनी केलेली विकासकामे परतुर मतदारसंघा बरोबरच मराठवाड्यात घराघरात पोहचविणे गरजेचे आहे.आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन सुद्धा भाजपाचे जालना जिल्हाउपाध्यक्ष,श्री.ज्ञानेश्वर (माऊली)शेजुळ यांनी उपस्थितांना केले आहे.यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.जिजाबाई जाधव यांनी सुद्धा मा.राहुलभैय्या लोणीकराविषयी गौरवोद्गार काढले व उपस्थितांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास दिलीप जोशी,शिवराज तळेकर,विशाल गिते,पिराजी मेहेत्रे,सईद पटेल,समाधान वाघमारे,प्रमोद भालेकर,गजानन राठोड,संजय काळे,प्रभाकर गाढवे,दिलीप पोमने,अनिल शेटे,दिनकर शिलवंत,शे.खाजा,सतिश सदावर्ते,संतोष निंबाळकर,नंदु देशमुख,राजु देशमुख,बाळकृष्ण देशमुख,बबन झोरे,मुन्ना पटेल यांच्यासह सेवली सर्कलमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment