रिक्त पदांमुळे चिचगड ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर

 

गोंदिया-शैलेश राजनकर

चिचगड,दि.17:- देवरी तालुक्यातील चिचगड नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील मुख्य गाव म्हणून ओळखले जाते.त्यातच या भागातील नागरिकांना आरोग्याची सोय चांगली उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सुरु करण्यात आले.मात्र या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीसह इतर अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना योग्य उपचाराअभावी परत जाण्याची वेळ येऊ लागली आहे.त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरली जावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.गेल्या दशकापुर्वी तयार करण्यात आलेल्या या ग्रामीण रुग्णालय परिसरातील लोकसंख्या सुध्दा वाढली असून वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत अधिकारी व कर्मचारी वर्ग अपुरा पडू लागला आहे.त्यातच रुग्णालयातील खाटाही कमी पडू लागल्याने 100 खाटांचे रुग्णालय व्हावे अशी मागणी केली जाऊ लागली आहे.

चिचगड हे त्या क्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाण असून मोहांडी,ककोडी , केशोरी, अबोंरा, आलेवाडा,परसोडी , कवलेवाडा, सिंदीबीरी या परिसरातील अनेक गावांतून दररोज १०० ते २०० च्या आसपास रुग्ण उपचारासाठी येत असतात.या रुग्णालयात गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकिय अधिकारी डॉ भोंगाडे हे येथे एकमेव कार्यरत आहेत. त्यांनाच आता अतिरिक्त कामे सांभाळावे लागत आहे.रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे कर्मचारी वर्गाची व सोई-सुविधाचीं गरज आहे. त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
अनेक पदे रिक्त
चिचगड ग्रामीण रुग्णालयात संपुर्ण २६ पदे मंजुर असुन फक्त १६ पदे भरलेली आहेत व १० पदे अनेक वर्षापासुन रिक्त आहेत.त्यामध्ये वैद्यकिय अधीक्षक रिक्त,सहाय्यक अधिक्षक रिक्त,कनिष्ट लिपीक २-रिक्त,अधिपरिचारीक ३-रिक्त,
प्रयोगशाळा सहाय्यक १-रिक्त,क्ष-किरण तंत्रज्ञ १-रिक्त,शिपाई १-रिक्त पदे आहेत.

Leave a Comment