रेतीच्या साठ्यासह टिप्पर व विना क्रमांकाची जेसीबी जप्त ..महसूल विभागाची कारवाई !

 

साखरखेर्डा (प्रतिनिधी )

अवैध रेतीचे केंद्र बनलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील एका शेतामध्ये असलेला रेतीचा साठा व तसेच तेथे असलेली टिप्पर व विना क्रमांकाची जेसीबी महसूल विभागाच्या पथकाने 2 डिसेंबर रोजी जप्त केली !तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील एका शेतामध्ये रेतीचा साठाअसल्याची माहिती तहसीलदार सुनील सावंत यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे नायब तहसीलदार प्रवीण लटके तलाठी प्रदीप मोगल तलाठी माघाडे यांच्या पथकाने हिवरखेड पूर्ण गावात भेट दिली असता यावेळी नवीन गावाच्या पूर्वेस गट नंबर 131 मध्ये दहा ते पंधरा ब्रॉस रेतीचा साठा आढळून आला !तसेच विना क्रमांकाच्या जेसीबीने टिप्पर क्रमांक एम एच 28 एबी 72 76 मध्ये रेती साठवत असल्याचे आढळले ‘यावेळी नायब तहसीलदार प्रवीण दटके यांनी परवाना मागितलं असतं त्यांच्या जवळ कुठलाही परवाना आढळून आला नाही ।येळी नायब तहसिलदार लटके यांनी टिप्पर मालक लक्ष्मण माधवराव काटकर यांच्याविरुद्ध किनगावराजा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली .तसेच जेसीबी व टिप्पर पोलीस जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आले । यावेळी जेसीबी चालक घटनास्थळावरून पसार झाला होता ‘यावेळी जीसीपी मालकाचा शोध महसूल कर्मचारी व पोलीस घेत आहे !

Leave a Comment