रोटरी क्लब कडून संजय गांधी विद्यालय (परडा ) ला सिलिंग फॅन भेट

 

हिगंणघाट:- रोटरी क्लब तालुका स्तरावर कार्य करणारी संस्था असुन नेहमीच तालुक्यात असलेल्या शाळांना आवश्यक असणार्‍या वस्तु भेट देत असते.
शासनामार्फत शाळेला मिळनारे अनुदान फार तोकडे असते त्यामुळे विद्यार्थांना आवश्यक असणार्‍या सोई पुरवु शकत नाही त्यामुळे रोटरी क्लबने पुढाकार घेउन शाळेला तिन सिलिंग फॅन भेट दिले.
कार्यक्रमासाठी मंचावर रोटरी अध्यक्ष पराग कोचर शाकिरखान पठाण प्रा.अशोक बोंगिरवार डाॅ.सतिश डांगरे ,भुपेंद्र शहाने, दिगाबर खांडरे होते. आपले मनोगत व्यक्त करतांना भुपेंद्र शहाणे यांनी शिक्षकानी विद्यार्थाना घडविने म्हणजे कुभंराने ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्यासारखे आहे.
.अध्यक्ष पराग कोचर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक मुळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले

Leave a Comment