रोटरी क्लब व नगर परीषद हिंगणघाट च्या गणेश विसर्जन कुंडला भव्य प्रतिसाद

 

हिंगणघाट:-नगर परीषद व रोटरी क्लब हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुलधाम येथे गणेश विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार केले आहे.या विसर्जन कुंडाचे एस डी एम मा.शिल्पा सोनाले मॅडम यांचे हस्ते सकाळी उदघाटन करण्यात आले यावेळी न.पा चे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, पी.आय कैलासजी फुंडकर, क्लब अध्यक्ष पराग कोचर प्रा.मिहानी मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते.या गणेश विसर्जन कुंडाला क्लबच्या वतीने सुभोशित करण्यात आल्यामुळे भाविक भक्तांसाठी भावनिक वातावरण निर्माण झाले होते.या प्रसंगी एस.डी.एम सोनाले मॅडम यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की दहा दिवस गणेश उत्सवानंतर विसर्जनात नद्यांचे प्रदुषण होऊ नये यासाठी गणेश भक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन या निर्माण केलेल्या कुंडावर विसर्जन करुन समाजाला जो संदेश दिला त्याचे काैतुक करावे तेव्हढे कमीच आहे.या वर्षी गणेश विसर्जनासाठी कोणतेही निर्बंध नसुनसुध्दा या कु्ंडाला प्रचंड प्रतिसाद मिळाला यासाठी क्लब अध्यक्ष पराग कोचर यांनी गावातील लोकांचे आभार मानले. प्रोजेक्ट डायरेक्टर सुरेश चाैधरी उदय शेंडे, रुपेश हिवरकर यांनी या कुंडाची सजावटी साठी परीश्रम घेतले. सदस्य प्रा.अशोक बोंगिरवार ,सचिव सतिष डांगरे, शाकिरखान पठाण प्रा.जितेंद्र केदार,,शशांक खांडरे,मितेश जोशी,क्रिष्णा जोशी, पुंडलिकजी बकाने, प्रभाकर साठवणे,राजु निखाडे,मुरली लाहोटी,मुकुंद मुधंडा,केदार जोगळेकर अतुल हुरकट, डाॅ.प्रकाशजी लाहोटी ,वैभव पटेलिया,डाॅ.संदिप मुडे, रवी नल्लावार ,जितेंद्र वर्मा,चेतन पारेख,यांनी तेथील व्यवस्था व्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी दोन दिवस परीश्रम घेतले.

Leave a Comment