Home Breaking News रोही समोर आल्यामुळे त्याला वाचवण्याच्या नादामध्ये बस रस्त्याच्या कडेला !सुदैवाने चालकाच्या सतर्कतेने...

रोही समोर आल्यामुळे त्याला वाचवण्याच्या नादामध्ये बस रस्त्याच्या कडेला !सुदैवाने चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली !

457
0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

कै .विजय मखमले विद्यालय मलकापूर पांग्रा जवळ दिनांक 21 जानेवारी च्या सकाळी सात वाजेच्या सुमारास लोणार -खामगाव – एम एच – ४० – ८६७८ ही बस खामगाव कडे जात असताना.

अचानक समोर रोही आल्यामुळे रस्त्याच्या उजव्या बाजूला कलंडली ‘रोहिला वाचवण्याच्या प्रयत्नात मध्ये ही बस वाहन चालक यांच्या सतर्कतेमुळे बाजूला कडेला कलंडली.

मोठी बातमी फक्त एक क्लिक वर

सरपंच पदासाठी आतापासूनच रस्सीखेच !सरपंच पदाच्या आरक्षण सोडत कडे लक्ष !साखरखेर्डा कडे सर्वांचे नजरा !

 

 

वाहन आतमोहम्मदयांनी शर्तीचे प्रयत्न करूनही बस कडेला गेली तरीही वाहनचालकाने शर्तीचे प्रयत्न करून बसवर नियंत्रण मिळवल्याने बस आणि बसमधील प्रवाशांना जास्त गंभीर मार लागला नाही.

किरकोळ मार लागला !वाहन चालक मोहम्मद आणि वाहक विशंभर रामकृष्ण निकले हे लोणार -खामगाव बस ने खामगाव कडे निघाले होते.

यामध्ये 14 प्रवासी प्रवास करत होते ।प्रवाशांना किरकोळ मार लागला असून त्यांना तातडीने मलकापूर पांग्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले.

यामध्ये वाहन चालकासह -सुमेध शेजुळे वय १९(‘ बिबी ) -सीमा रवींद्र मूळवकर वय 32 (बिबि )रवींद्र राधाकिसन मुळवकर 3५ बिबि )लता भाऊराव बरबळे वय ४२ बिबी ) एकनाथ मुळे ‘ 62 बिबि )कांताबाई गाईत ६० बिबि )यांच्यासह अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले.

जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मलकापूर पांग्रा येथे नेण्यात आलेव त्यावर उपचार करून त्यांना दुसऱ्या बसची व्यवस्था करून रवाना करण्यात आले.

सुदैवाने मोठी दुर्घटना यावेळी तळणी परंतु या निमित्ताने मलकापूर पांग्रा ते दुसरबीड पर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून ते बुजवण्याचे काम सुद्धा करणे गरजेचे आहे

Previous articleसरपंच पदासाठी आतापासूनच रस्सीखेच !सरपंच पदाच्या आरक्षण सोडत कडे लक्ष !साखरखेर्डा कडे सर्वांचे नजरा !
Next articleसततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here