Home Breaking News लम्पी आजाराच्या निर्मूलना साठी उपाय योजना करा – राम पाटील

लम्पी आजाराच्या निर्मूलना साठी उपाय योजना करा – राम पाटील

288
0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

संपूर्ण राज्यात थैमान घातलेल्या ‘लम्पि’ या आजाराने वाशिम जिल्ह्यातील अनेक जनावरे बाधित झाली असून या आजाराला आळा घालण्यासाठी तालुका स्तरावर उपाय योजना करण्यात याव्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने पशुसंवर्धन तालुका अधिकारी याना निवेदन देण्यात आले.
जनावरांच्या शरीरावर गाठी येऊन ताप येणे, चारा न खाणे , नाक व डोळ्यातुन पाणी येणे , यासारखी लक्षणे दिसून लम्पि या विषाणू जन्य आजाराच्या मोठ्या प्रमाणात जनावरांना लागण होत आहे . त्यामुळे पशुपालक शेतकरी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत . तालुक्यातील प्रत्येक उपकेंद्रा वर शिबिर घेऊन शेतकऱ्यांना माहिती व उपाय काय आहेत याची जाणीव करून देण्यात यावी या आजारावर प्रतिबंधक असलेली ‘गोट फॉक्स’ ही लस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावी . तालुका स्तरावर तसेच उपकेंद्रावर नियुक्तीस असलेल्या पशुधन विकास अधिकारी , कर्मचारी यांना ग्रामस्तरावर सर्वे करून उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात याव्या यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष युवक राम पाटील बोरकर , शहर संघटक राहुल डांगे , शो. मी. ता. अध्यक्ष मयूर हिवाळे , तालुका उपाअध्यक्ष अजय बोडखे , अभिषेक देशमुख,राहुल डांगे ,ऋषिकेश देशमुख ,उमेश राईटकर , रवी गाडे , समाधान गाडे , सचिन गाडे , गणेश माने , ज्ञानेश्वर कांबळे ,अमोल डांगे ,संतोष पाटील ,शुभम कदम , समाधान खळबर ,अभिषेक कोरडे , पवन खोडके , वैभव कांबळे , विश्वास चव्हाण ,भगवान राऊत, अविनाश पाटील , महादेव पाटील , विष्णू मुंडे ,आशिष चोपडे , भगवान पाटील , गोरख डांगे , शिवराज , खिराडे , राजेश पडगान , बाळासाहेब बोडखे , सतीश पाटील , यांची उपस्थिती होती .
यावेळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी केंद्रे मॅडम यांनी लम्पि या आजारा संदर्भात शेतकऱ्यांनी घाबरून न जाता लक्षणे दिसताच प्राथमिक उपचार करावेत व तीव्र लक्षणें असल्यास जवळच्या आरोग्य केंद्रातुन उपचार करून घ्यावेत आजारी असलेल्या जनावरांना इतर जनावरणापासून वेगळे ठेवण्यात यावे अशी माहिती दिली.

Previous articleअचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत कोंटी येथे शेतकऱ्यांचे ऊस पिकांचे नुकसान
Next articleसूनगाव ग्रामपंचायत प्रशासकपदी श्री पी एच राजपूत रुजू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here