Home Breaking News लाखो रुपयाची घंटागाडी बेवारस अवस्थेत ……..

लाखो रुपयाची घंटागाडी बेवारस अवस्थेत ……..

587
0

 

संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सोनाळा ग्रामपंचायत चा रामभरोसे कारभारामुळे गावामध्ये कचऱ्याचे ढीगच ढिग दिसत असताना ग्रामपंचायत घंटागाडी गेल्या दोन महिन्यापासून बेवारस अवस्थेमध्ये असल्याचे वास्तव्य समोर येत आहे. ग्रामपंचायत कारभार रिमोटद्वारे चालत असल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे. कित्येक महिन्यापासून ग्रामपंचायतची घंटागाडी एका बेवारस अवस्थेत मध्ये असताना ग्रामपंचायत भाड्याने ट्रॅक्‍टर सांगून अमावस्या पौर्णिमेला ग्रामपंचायत तोंड पाहू पणा करत ओळखीच्या व राजकीय लोकांच्या वस्तीतील कचरा उचलत असल्याचे चित्र दिसून आले .काही वर्षा अगोदर गावातील कचरा उचलण्यासाठी मंजूर होऊन आलेली घंटागाडीचे स्वगत ग्रामपंचायतीने मोठा गाज्या वाज्यात करत लाखो रुपयाची घंटा गाडी खरेदी केली. पण तिचा उपयोग होत नसल्याने संपूर्ण गावामध्ये कचऱ्याचे डिगच डिग दिसत आहे अश्यातच ग्रामपंचायत ची घंटागाडी अखेरच्या घटका मोजू लागली आहे. या गाडीचा वापर होत नसल्याने ती गंजू लागली आहे.ग्रामपंचायत कचरा व्यवस्थापन करत नसल्याने त्याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे.
संग्रामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुनर्वसन झालेले लोक आपले वास्तव्या करता सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत पुनर्वसन होऊन बसलेले आहेत . अश्यातच नागरीकांचे वाढते प्रमाण व त्यातच त्यांना दुर्गंधी व कच-या च्या ढिगाजवळ आपले जिवन जगत आहे . कचरा व घाण पाणी याची विलेवाट करण्यास असमर्थ ठरलेले ग्रामपंचायत कारभार कसा चालणार या कडे सोनाळा येथील नागरिक सभ्रमात पडलेले आहे . गावा मध्ये स्वच्छतेचा अभाव व नव नवीन सुविधा कडे लक्ष न देता स्वतःचा पोटभरू पणा करताना दिसत आहे. गावाची समस्या ही समस्या राहत असल्याने गावकरी संपूर्ण त्रस्त झाले आहेत. अशातच संपूर्ण गावाला कचऱ्याने वेढले आहे. साठलेला कचरा पेटवून दिला जातो त्यामुळे धुराचे लोट तयार होत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.अनेक वेळा त्यात ओला कचरा असल्याने त्यांची दुर्गंधी सुटत असून याचा त्रास गावकऱ्यांना होत आहे.
सोनाळा ग्रामपंचायतीची घंटागाडी अखेरच्या घटका मोजत असताना प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. वाढत्या कचऱ्याच्या खाद्यपदार्थावर जगणाऱ्या घुशी आणि भटक्या‌ आणि त्यानंतर भटक्या कुत्र्याचे मात्र चांगले पावले आहे .या मोठ्या मोठ्या घुशीचा त्रास मात्र गावातील नागरिकांना भोगावा लागत आहे. तसेच काही ठिकाणी भटक्या कुत्र्या पासून वाटसरूंना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.गावातील कचऱ्याचे वाढते साम्राज्य आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास याचा विचार करून अडगळीत पडलेली आणि कचरा जमा करणारी घंटागाडी बाहेर काढून तिचा वापर करावा आणि नागरिकांना सेवा द्यावी अशी मागणी गावातील नागरिक वर्ग करत आहे

Previous articleशेतकरी व कामगार संबंधित कायदा दुरूस्ती च्या विरोधात काँग्रेस अंदोलन करणार .जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याणराव काळे
Next articleहिवरखेड मध्ये अवैध साठवणूक केलेला सागवान जप्त, कारवाई मध्ये लाखो रुपयांच सागवान सह मशीन जप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here