लोकशाहीचा डोलारा भारतीय संविधानावरच आधारित आहे : इंजि.डि.टि.शिपणे,

 

अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने संविधान दिन संपन्न !

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

लोकशाहीच्या पवित्र मंदिरात भिन्न विचारधारेचे सत्ताधारी येऊन सत्ता करुन जातात.मात्र लोकशाहीचा हा डोलारा हा सत्ताधाऱ्यांच्या वैचारिकतेवर अथवा मानसिकतेवर अवलंबून नसून तो भारतीय संविधानावरच आधारित आहे असे प्रतिपादन २६ नोव्हेंबर संविधान दिन सामाजिक न्याय दिनानिमित्त अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष इंजि.डि.टि.शिपणे यांनी केले,मच्छी ले आऊट येथे २६ नोव्हेंबर २०२० रोजी सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजि.डि.टि.शिपणे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून अशोक दुलिचंद शिंगणे, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे, राज्य उपाध्यक्ष इंजि.अशोक भोसले,सल्लागार डॉ बबन परमेश्वर,इंजि.शिवाजी जोहरे,जिल्हाध्यक्ष प्रकाश डोंगरे,देवसिंग शिराळे,चंदासिंग बिबे, डाॅ किशोर बिबे, समाधान चिंचोले, ॲड.बुर्जे,युवा नेते तुषार शिपणे,विनोद बिबे, श्री वरच्छाये,समाधान सरसरे यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी प्रकाश डोंगरे म्हणाले की संविधानाच्या निर्मिती पुर्वी भारत देशामधे ओबीसी अनुसूचित जाती, जमाती व अठरा पगड जातीच्या व भारत देशातील सर्वच गोरगरीब लोकांना डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण करण्यापुर्वी इंग्रजांच्या जुलमी राजवटीने व भारत देशातील जीर्ण रूढी परंपरांनी व खुळचट चालीरीतींना व भारत देशातील अठरा पगड जातींच्या लोकांवर चालणाऱ्या जुलमी शासन आणी शोषण प्रणालीने आपला माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावून घेतला होता तो हक्क व प्रत्येकाला जगण्याचा समाण हक्क डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखित भारतीय संविधानाने आपल्याला मिळवून दिला असेही डोंगरे म्हणाले, तर इंजि.अशोक भोसले,डाॅ बबन परमेश्वर,इंजि.शिवाजी जोहरे,शरद खरात, डाॅ.किशोर बिबे,पुरुषोत्तम बोर्डे,यांनीही आपले विचार मांडले, सदर कार्यक्रमाला अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे पदाधिकारी व चर्मकार समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचलन डाॅ.किशोर बिबे तर आभार प्रदर्शन समाधान चिंचोले यांनी मानले यशस्वीतेसाठी नंदकिशोर माळी,राजू परमेश्वर,दिपक परमेश्वर

Leave a Comment