सिल्लोड तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ
लोणवाडी ते पळशी हा रस्ता मागील वर्षी पासुन अपघाताचं माहेरघर बनले आहे.. या रस्त्यावर मागील वर्षी अवजड वाहने… डंपर यांच्या अती वापरामुळे रस्त्याच्या दुतर्फाना खोल खड्डे पडले आहेत तर मधोमध उंच कठडा तयार झाल्यामुळे मोटारसायकल व लहान वाहने यांना खुप कसरत करावी लागत आहे.या रस्त्याचा वापर अंधारी,म्हसला बु, म्हसला खु,मांडगाव, टाकळी व मोहरा येथील नागरीक दवाखाना व शासकीय कामासाठी सिल्लोड येथे जाण्यासाठी वापर करतात परंतु शासन व प्रशासन यांचे या रस्त्याकडे अजून दुर्लक्ष आहे या रस्त्याची लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी लोणवाडी येथील नागरीक व शेतकरी बांधवांनी केली आहे…