Home Breaking News लोणार तालुक्यातील बोरखेडी लघु प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या पार्डी शिरसाट या गावचे पुनर्वसन...

लोणार तालुक्यातील बोरखेडी लघु प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या पार्डी शिरसाट या गावचे पुनर्वसन करावे ! पालकमंत्र्यांना निवेदन !

505
0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

लोणार तालुक्यातील पार्डी सिरसाठ हे गाव बोरखेडी लघु संग्राहक प्रकल्पामध्ये सन 2001 साली बाधित झाले होते !याबाबत लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे लोणार तालुका उपाध्यक्ष शुभम सिरसाट यांनी पालकमंत्री डॉ .राजेंद्र शिंगणे यांना 12फेब्रुवारी रोजी निवेदन दिले आहे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे कीत्या गावातील लोकांना घराचा मोबदला हा २००४ सालच्या बाजार भावाप्रमाणे मिळाला होता परंतु त्या कालावधीत जागा उपलब्ध न झाल्यामुळे गावाचे पुनर्वसन होऊ शकले नाहीपरंतु त्यानंतर शासनाने 2019 -20 मध्ये जागा उपलब्ध करून दिलीव उपलब्ध करून दिलेल्या जागेवर गावकऱ्यांना भूखंड देखील वाटप करण्यात आले .भूखंड वाटप केले जरी असली तरी घर बांधण्याकरता गावकर्‍याकडे पाहिजेत असे पैसे उपलब्ध नाहीकारण गावकर्यांना मिळालेला मोबदला हा2007 मधील बाजारभावाप्रमाणे 2013 -14 यावर्षी मिळाला होता व मिळालेला मोबदला हा खूपच कमी होता !मिळालेला मोबदला हा आजही गावकर्‍याकडे शिल्लक नसून प्रकल्पबाधित गावकऱ्यांना आजच्या भावा प्रमाणे रक्कम देण्यात यावी ।जर शासनाकडून गावकऱ्यांना मदत मिळाली नाही तर गावकरी हे घरे बांधणार तसे तरी कसे ?हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो ।पुनर्वसन विभागाकडून भूखंड वाटप करण्यात आलेली आहे व भूखंड धारक आज रोजी कब्जा हक्क रक्कम भरणे इतकेही सक्षम नाही !तरीही कब्जा हक्क रक्कमही माफ करून प्रकल्पग्रस्त लोकांना न्याय द्यावा अशी मागणीही यावेळी ‘राष्ट्रवादीचे विद्यार्थी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष शुभम सिररसाट यांनी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे !

Previous articleनांदुरा येथे नवीन एम.आय.डी.सी. च्या जागेची स्थळ निश्चिती करून मंजुरीचा प्रस्थाव तात्काळ शासनास सादर करावा.- आमदार राजेश एकडे
Next articleसाखरखेर्डा ते गुंज रस्त्याचे काम सुरु ! !वैभव तुपकर ने दिला होता आंदोलनाचा इशारा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here