औरंगाबाद वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे चौकशी विभागातील एकास सोबत घेऊन वक्फ बोर्डाची करोडो रुपयांची मालमत्ता बुडवित असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. याची चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे व पगारातून रक्कम वसूल करावी. अशा प्रकारचे निवेदन समाजवादी पार्टीचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख शेखा सअईद शे.कदीर जळगाव (जामोद) यांनी दि. 24 /3/ 2022 ला राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री ,व संबंधित मंत्री, सचिव यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की वक्फ बोर्ड औरंगाबाद येथे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. तसेच वक्फ बोर्डातील मुख्य कार्य अधिकारी हे आसिफ मुतवल्ली यांना सोबत घेऊन बोर्डाची करोडो रुपयांची मालमत्ता बुडवित आहे. तसेच 6/2/2022 रोजी स्व. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्र सरकारने दि, 7 /2 /2022 रोजी सुट्टीची घोषणा केली होती. परंतु सुट्टी असतांना देखील वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विरुद्ध पक्षासोबत आर्थिक देवाण-घेवाण करून बोगसऑर्डर दिली आहे. अशा अनेक बोगस आॕर्डर त्यांनी दिले आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. तरी वक्फ बोर्ड औरंगाबाद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांनी आतापर्यंत शासनाकडून घेतलेला पगार त्यांच्याकडून वसूल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे.