गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी
जळगाव जामोद तालुक्यात सातत्याने नवनवीन उपक्रमात अग्रेसर असलेली ग्राम वडशिंगी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा आहे.
आय.एस.ओ.मानांकन प्राप्त करणारी ही तालुक्यातील पहिली शाळा असून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, गावकरी, पालक, मुख्याध्यापक व त्यांचे सहयोगी शिक्षक यांच्या परिश्रमामुळेच शाळेला आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.
ही बातमी पण पहा सोबतच
https://www.suryamarathinews.com/post/8209
आय.एस.ओ. मानांकनाशी संबंधित अधिकारी पी.एन.पाटील यांनी ५जानेवारी रोजी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन आय.एस.ओ. करण्यासाठी शाळेची पाहणी केली.
आणि त्यांच्या सकारात्मक अहवालानंतर दि.२४ जानेवारी रोजी शाळेला आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वकीलखान मेहबूबखान यांनी सांगितले.संपूर्ण तालुक्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी वडशिंगी शाळा आज ISO शाळा देखील झाली.शाळेला ISO मानांकन मिळविण्यासाठी अनमोल मार्गदर्शन करणारे गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे , गटशिक्षणाधिकारी फाळके ,शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र तायडे ,केंद्रप्रमुख वाघ,शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष वकिलखां व त्यांचे सहकारी
सदस्य,मुख्याधिपिका सौ.शोभाताई सारंगधर गोमासे आणि त्यांचे सहयोगी शिक्षक यांनी गेल्या वर्षभरात ह्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
शाळेला शाळा ISO करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणारे शाळा व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी, ग्रामपंचायत वडशिंगी चे सरपंच, सचिव आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य,तलाठी, मुख्याध्यापिका सौ.एस.एस. गोमासे ,व शिक्षक वृंद श्रीकृष्ण भटकर ,सोळंके,येणकर मॅडम,कपले मॅडम, शृंगारे सर, बशिरे सर,या सर्वांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वकीलखां यांनी अभिनंदन करून आभार मानले.
व भविष्यातही शाळेच्या उत्कर्षासाठी ह्या सर्वांचे सहकार्य राहील ,अशी अपेक्षा व्यक्त केली. ही शाळा वर्षभर प्रत्येक उपक्रमात, राष्ट्रीय उत्सवात सातत्याने अग्रेसर असते .
ह्या शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे यांनी सुद्धा या ग्रामस्थ,पालक, शाळेच्या व्यवस्थापन समिती व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
तसेच या शाळेचा आदर्श तालुक्यातील इतर शाळांनी सुद्धा घ्यावा अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे.