सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी येथील युवक बेपत्ता झाला आहे. 28 जानेवारीपासून तो गायब असून, त्याचा सगळीकडे शोध घेऊन अखेर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
भगवान हरिचंद काकड (31, रा. वडळी ता. सिंदखेड राजा) 28 जानेवारीच्या सकाळी ट्रॅक्टरमध्ये कापूस घेऊन तो देऊळगाव राजा येथे आला होता. कापूस विक्री करून तो सिंदखेड राजा येथे आला. तिथे प्रताप उत्तम जाधव यांच्या ट्रॅक्टरमध्ये सिमेंट भरून दुचाकीने घरी निघाला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र त्याचा पत्ता लगला नाही. त्यामुळे नंदकिशोर प्रल्हाद घोंगे (36, रा. बामखेड ता. सिंदखेड राजा) यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दिली आहे. रंग गोरा, उंची 5.5 फूट, नाक सरळ, अंगात लाल- काळे पट्टे असलेले टी शर्ट, काळी पँट, पायात काळी चप्पल असे युवकाचे वर्णन आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ. श्री. नागरे करत आहेत. हा युवक कोठे आढळल्यास पो. काँ. नागरे यांच्याशी मो. नं. 7020370018 वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.