वयोवृद्ध महिलेस दिवसाढवळ्या लुटले दागीण्यासह ३ चोरट्यांना केले पोलिसांनी जेरबंद

 

हिंगणघाट प्रतिनिधी दि.22
स्थानिक कोचर वार्ड परिसरातील वृद्ध महिलेचे कानातील सोन्याच्या बाळ्या व नाकातील नथनी जबरदस्तीने लुटल्याप्रकरणी शहरातील तीन आरोपीस पोलिसांनीअटक केली.
अधिक माहितीनुसार स्थानिक कोचर वार्ड येथील महिला श्रीमती अंगुरीबाई गुलाबसिंग चितोडिया(63) ही काल मंगळवारी सकाळी शौचाला गेल्यानंतर घरी परतत होती.
यावेळी या आरोपींनी सदर महिलेस रस्त्यावरती अडवून जबरदस्ती करीत महिलेचे कानातील सोन्याच्या बाळ्या तसेच नाकातील नथ असे एकूण 13 ग्राम सोन्याचा ऐवज लुटला.
सदर महिलेने हिंगणघाट पोलिस ठाण्यात तक्रार देताच हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास करीत प्रज्वल सुनिल कडु वय 18 वर्ष, रा. तेलंगखेडी, तहसील कार्यालयाचे मागे, हिंगणघाट, अभिषेक भैय्याजी वरभे, वय 19 वर्ष, रा. चिमटेबाबा ग्राऊन्ड, कोचर वार्ड, हिंगणघाट व आकाश धनजी गोडकिया, वय 19 वर्ष, रा. चिमटेबाबा ग्राऊन्ड, कोचर वार्ड, हिंगणघाट यांस मुद्देमालासह अटक केली. आरोपींनी नमुद गुन्हा केल्याची कबुलीसुद्धा दिली आहे.
सदरची कामगीरी प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. कैलास पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात पोउपनि पपीन रामटेके, डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, पोशि. भारत बुटलेकर यांनी केली.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

Leave a Comment