Home बुलढाणा वरवट बकाल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने संग्रामपूर मित्र परिवाराचे...

वरवट बकाल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गोरगरीबांना अहोरात्र आरोग्य सेवा देणारे दानशूर व्यक्तीमत्व मा. शंकरभाऊ पुरोहित यांना महाराष्ट्र बहुजन ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य मित्र पुरस्कार

320
0

 

संग्रामपूर – आज वरवट बकाल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने संग्रामपूर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष गोरगरीबांना अहोरात्र आरोग्य सेवा देणारे दानशूर व्यक्तीमत्व मा. शंकरभाऊ पुरोहित यांना महाराष्ट्र बहुजन ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आरोग्य मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल संग्रामपुर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला…
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वरवट बकाल चे ग्राम पंचायत सदस्य चक्रधर इंगळे होते तसेच प्रमुख उपस्थितीत जेष्ट नेते देविदास दामोदर , माजी पंचायत समिती सदस्य दशरथ भाऊ सुरडकर , आबाराव इंगळे , पंचायत समिती सदस्य शेषराव खंडेराव , संजु भाऊ इंगळे असंख्य समाज बांधव उपस्थित होते… बोलतांना देविदास दामोदर यांनी सांगितले की सत्कार त्यांचाच होतो ज्यांचे सत्कार्य असते…. प्रास्ताविक राहुल इंगळे सर यांनी केले तसेच सूत्रसंचालन विजयभाऊ पहुरकर यांनी केले .. आभार संजु भाऊ इंगळे यांनी मानले.तालुक्यातील मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते…

Previous articleदखल सूर्या मराठी न्युज ची सुनगाव येथील वार्ड नंबर 6 मध्ये सफसफाईचे काम सुरू
Next articleसत्याग्रह शेतकरी संघटनेचा अयाज भाऊ शेख यांच्या नेतृत्वाखाली सर्व नियमांचे पालन करून शेगांव तहसील येथे आकाल मोर्चा काढण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here