वर्धा जिल्ह्यात भाजप ,काँग्रेसला झटका तर राष्ट्रवादीचे पारडे जड !

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते माजी केंद्रिय मंत्री सुबोध मोहिते साहेब तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या पुढाकाराने आज मुंबई येथे वर्धा जिल्ह्यातील अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. वर्धा जिल्ह्यातील सिंधीरेल्वे येथील भाजपच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा संगीता शेंडे, हिंगणघाट शहरातील नगरसेवक दादा देशकरी, माजी सरपंच , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक ,माजी कॉंग्रेस जिल्हा सचिव प्रशांत घवघवे
वर्धा जिल्हा माजी उपाध्यक्ष भाजपा राजू गंधारे, वर्धा विभागीय शक्ती प्रमुख सुनील शेंडे व इतर मान्यवरांनी हाती घड्याळ बांधले. सर्व मान्यवरांचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी पक्षात स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या पक्षप्रवेशा दरम्यान माजी नगर सेवक, प्रलय तेलंग, अमोल बोरकर देखील प्रामुख्याने उपस्थित होते
या पक्ष प्रवेशाने भाजप सोबत काँग्रेसला देखील जिल्ह्यात मोठा झटका पडला आहे.
अतुल वांदिले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर पक्षाने त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीसपदी नियुक्त केल्या नंतर , मोठ्या प्रमानात पक्षप्रवेश सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीकोनातून पुढेही सतत पक्षप्रवेश असाच सुरू राहील व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल अशे विचार अतुल वांदिले यांनी यावेळी व्यक्त केले.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

Leave a Comment