वाडेगावात १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रेरणा वार्षिकांकाचे प्रकाशन संपन्न

 

योगेश नागोलकार
तालुका प्रतिनिधी पातूर

पातुर :-बाळापूर तालुक्यातील स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन व श्री जागेश्वर क्लासेस वाडेगाव च्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व प्रेरणा वार्षिकांकाचे प्रकाशन कार्यक्रम २४ जुलै रविवार रोजी श्री जागेश्वर विद्यालयाच्या सभागृहात मोठ्या थाटात पार पडला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोषदादा मानकर(अध्यक्ष:-ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ,वाडेगाव),प्रमुख मार्गदर्शक संदीप मूर्तडकर(संचालक:-मेरिट मेकर प्रोजेक्ट,अमरावती),प्रमुख अतिथी डॉ. विनित हिंगणकर(संचालक:-ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अकोला),सामाजिक कार्यकर्ते)
प्रा.डॉ.संतोष हुशे,पंकज इंडेन गॅस चे संचालक पंकज सहगल ,
घे भरारी स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र चे संचालक
प्रा.गोपाल वांडे,लोकसेवा करिअर अकॅडमी,अकोला
प्रा.डॉ.गजानन वाकोडे,छत्रपती सेना जिल्हाध्यक्ष नितीन पाटिल मानकर, उपाध्यक्ष डॉ.वा.फाळके,
प्रा.नितीन मानकर उपस्थित होते. या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन व श्री जागेश्वर क्लासेस द्वारा अकोला जिल्ह्यातील इयत्ता १० वी व १२ वी च्याजवळपास १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच आजच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रा.नितीन मानकर,विजय गावंडे, सौ.प्रांजल जयस्वाल,प्रा. प्रमोद कौसकार, विकास जाधव,उद्धव भाकरे इ.५ व्यक्तींचा *सन्मान कर्तृत्ववाचा:-२०२२* हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच हुशे ज्वेलर्स च्या वतीने स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष राजेश पाटिल ताले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश पाटिल ताले,आभारप्रदर्शन प्रतिक ताले,सुत्रसंचालन कोमल मते व कु.तन्वी खंडारे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश पाटिल ताले,प्रतीक ताले,अक्षय लांडे,भूषण ताले,राहुल ताले,शिवहरी लाहुडकार,वैभव खंडारे, सोपान ताले,शिवम घोगरे,ज्ञानेश्वर सरप,आदित्य टोळे,ओम घोगरे,प्रसाद लाहुडकार,सुयोग उगले,श्रीकृष्ण हनवते,उद्धव भाकरे, विकास भाकरे,वैभव बंड, मयुर ताले,आयुष ताले,अभय ताले,आदित्य पुंडे,तुषार काळे, रोशन पुंडे इ.प्रयत्न केले.

Leave a Comment