वाडेगाव पातुर महामार्गावर साचले पाण्याचे डबके

0
415

 

@पाण्याच्या डबक्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता
@पदचार्‍यासह विद्यार्थ्यांना चालावे लागते जीव मुठीत धरून

वाडेगाव पातुर महामार्गावरील दोन्ही बाजूने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नसल्याने ठीक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे मोठ मोठे डबके तयार झाले आहेत या डबक्यामुळे पदचाऱ्यासह  विद्यार्थ्यांना चालतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे

– वाडेगाव हे परिसरातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असल्याने येथे परीसरातील  २५ ते ३० गावातील नागरिकांना  दैनंदिन जाणे येणे करावे लागते तसेच या रस्त्यावर महाविद्यालय असल्याने या रस्त्यावरुन नेहमी शेकडो विद्यार्थ्यांची वर्दळ असते मात्र या रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता नाल्याच नसल्याने येथे पावसाच्या पाण्याचे मोठ मोठे डबके तयार झाले असल्यामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना पदचार्‍यासह विद्यार्थ्याच्या जीवित्वास  मोठा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे संबंधित विभागांने याकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्या काढून पाणी वाहते करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर  धरत आहे.

सूर्या न्यूज प्रतिनिधी संतोष काळे बाळापुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here