Home Breaking News वादळी पावसामुळे पीक नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ मदत जाहीर करा- प्रा. मोहन...

वादळी पावसामुळे पीक नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ मदत जाहीर करा- प्रा. मोहन रौंदळे यांची मागणी

552
0

 

संग्रामपूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस सुरू आहे. आणि या पावसाचे प्रमाण सतत वाढत असल्यामुळे आणि अतिवृष्टी सदृश्य वातावरण असल्यामुळे मका, सोयाबीन,कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अगोदरच दुबार तिबार पेरणी करून शेतकरी दुष्काळात सापडला आहे त्यात सततच्या पावसामुळे मुंग, उळीद पिकाचे नुकसान झाले असून आता मका, सोयाबीन चे पण पिकाचे नुकसान झाले आहे. वरवट बकाल येथील शेतकरी मोहन काशिराम रौंदळे गट नंबर 137 त्यांच्या शेतात 1 हेक्टर 20 आर मका लागवड केलेली आहे. 10 ते 15 दिवसात पिक तयार होणार अशावेळी वेळोवेळी वादळी पाऊस येत असल्यामुळे मक्का पिक पूर्ण जमीनदोस्त झाले असून पूर्ण पिक मातीत गेलेले आहे.त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळण्याकरिता तहसील कार्यालय संग्रामपूर व कृषी कार्यालय संग्रामपूर येथे दिनांक 16 सप्टेंबरला लेखी स्वरूपात तक्रार अर्ज केलेला आहे. तक्रार अर्ज मध्ये असे नमूद केले आहे. की रौदळे यांच्या शेताचा तात्काळ पंचनामा करून तसा अहवाल शासनास सादर करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी. तात्काळ परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा.
शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरकारकडून मदत व पीक विमा जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Previous article12 लाख 54 हजार बनावट दारू आणि साहित्य जप्त केले
Next articleप्रहार संघटनेचे रिकाम्या खुर्चीला हार टाकून आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here