वारकरी साहित्य परिषदेच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. शिवशंकर वासुदेव पाटील (डिक्कर) यांची निवड.

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

वारकरी साहित्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष ह.भ.प.श्री.विठ्ठल पाटील काकाजी यांचे मार्गदर्शनाखाली,
अकोला येथील, जुना शहर संत श्री गजानन महाराज मंदिर, शिवनगर येथे आज दि. 31/ 10/ 2022 रोजी वारकरी साहित्य परिषदेची सभा संपन्न झाली.
सभेमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी ह.भ.प. श्री.शिवशंकर वासुदेव पाटील (डिक्कर) कंचनपूर यांची वा.सा.प.च्या अकोला जिल्ह्यातील जेष्ठ कार्यकर्त्यांनी एकमताने निवड केली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. दिलावर नदाफ सर ( राज्य संपर्क प्रमुख प्रसिद्धी प्रमुख) हे होते. तसेच ह.भ.प. श्री. जितेंद्र कोलप (अकोला व वाशीम जिल्हासंपर्कप्रमुख ) ह.भ.प. श्री. संदीप गबाळे सर (सातारा जिल्हा संपर्कप्रमुख) ह.भ.प.दाभोळे सर (नांदेड संपर्क जिल्हाप्रमुख) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली
या कार्यक्रमास .श्री ह. भ. प. गुरुवर्य महाराज चोरे (भागवत धर्मप्रचारक) ह.भ.प.श्री गणेश गिरी महाराज (वा.सा.प.मुर्तीजापुर तालुकाध्यक्ष )
ह.भ.प. श्री.राजेंद्र महाराज वक्ते (अकोला तालुकाध्यक्ष)
ह.भ.प.श्री अच्युत महाराज बोराडे ( वा.स.प. अकोट तालुका )
ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज सोळंके, ह.भ.प. श्री. माणिकराव महाराज खूपसे, श्री ह.भ.प.भागवत बाबाश्री. ह.भ.प. सर्जेराव महाराज आणि कार्यवाही मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोला जिल्हा संपर्क प्रमुख जितेंद्र कोलप सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री ह.भ.प. रामकृष्ण महाराज अंबुसकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री ह.भ.प. जोध सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment