वाळू वाहतूकदारांकडून मंडळ अधिकाऱ्यास मारहाण यावल पोलिसात गुन्हा दाखल

 

यावल- ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

अनाधिकृत वाळू वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर येथील महसूल विभागाच्या पथकाव्दारे कार्यवाहीसाठी तहसील कार्यालया कडे आणत असतांना ट्रॅक्टर मालकासह दोन चालकांनी साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना

चापटा बुक्क्यांनी मारहाण करून गटारीत व काट्यात ढकलून दिले मंडळ अधिकारी यांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला असता त्यांचे दिशेने दगडफेक केली ,

यात मंडळ अधिकारी जखमी झाले असुन, मंडळ अधिकारी जगताप यांची फिर्यादीवरून यावल येथील पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मालकांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू वाहतुक प्रतिबंधात्मक उपायासाठी तालुक्यातील साकळी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांचे सह तलाठी मधुराज पाटील , कोतवाल विकास सोळंके हे गस्तीपथकावर असताना तालुक्यातील डांभुर्णी येथून कोळन्हावी येथील तापी नदीपात्रात जाणाऱ्या नाल्यात निळ्या रंगाचे ट्रॅक्टर दिसल्याने पथकाने त्यास थांबवून तपासणी केली असता ट्रॅक्टर मध्ये वाळू दिसून आली,

पथकाने परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वाहतुकीचा परवाना नव्हता , ट्रॅक्टर चालकाने कोळन्हावी येथील सुपडू रमेश सोळुंके यांचे ट्रॅक्टर असल्याचे सांगितले ट्रॅक्टर चालकांनी हायड्रोलिक द्वारे वाळू खाली करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असता पथकाने तात्काळ शासकीय वाहनास बोलावून ट्रॅक्टर कार्यवाहीसाठी यावल कडे आणत असताना, ट्रॅक्टर चालकाने नावरे फाट्या जवळून शिरसाड गावाकडे पळ काढला

त्याचा पाठलाग करून साकळी येथील मुस्लिम कब्रस्तान जवळ ट्रॅक्टर अडवीला असता ट्रॅक्टर मालक सुपडू रमेश सोळुंके चालक आकाश अशोक कोळी गोपाळ प्रल्हाद सोळुंके यांनी मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना मी तुला जिवंत ठेवणार नाही या सह लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जगताप यांना गटारीत व काट्यात फेकून दिले सचिन जगताप यांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला असता

त्यांचे दिशेने दगड गोटे भिरकावले ट्रॅक्टर मालकांसह दोन चालकांनी शासकीय कामात अडथळा आणून मंडळ अधिकारी जगताप यांना मारहाण करून दुखापत केल्याचे कारणावरून यावल.येथील पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment