वाशिम रिसोड रस्त्याचे काम पूर्ववत सुरू करा भूमिपुत्र संघटनेची मागणी

0
287

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

वाशीम रिसोड रस्त्याचे काम पूर्ववत सुरु करण्यासाठी भूमिपुत्रचा रास्ता रोको
वाशीम : रिसोड ते वाशीम रस्त्याचे नूतनीकरण सुरु असतांना कंत्राटदाराकडून अचानक काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत.  बंद केलेले काम पूर्ववत सुरु करून तात्काळ सुरु करावे यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात  गुरवार ता. ३ सप्टेंबर रोजी आसेगाव-कोयाळी फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले .
नोकरी व व्यापाराच्या दृष्टीने रिसोड ते वाशीम ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या या प्रमुख रस्त्याचे काम रखडल्याने प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत. नियमित ये जा करणाऱ्या अनेकांना मणक्याच्या आजाराने ग्रासले आहे तर वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे हे रखडलेले रस्त्याचे काम पूर्ववत सुरु करावे, खोदून पडलेल्या रस्त्याकडे कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे याची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, व काम चालू असतांना पर्यायी मार्ग व्यवस्थित ठेवण्याची जबादारी निश्चित करण्यात यावी. या मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात भूमिपुत्र शेतकरी संघटना रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
*विलंब होत यासल्याची अधिकाऱ्यांची कबुली*
आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता व्ही एम देशमुख यांनी बांधकामात दुरुस्तीसाठी विलंब होत असल्याची कबुली यावेळी दिली
आंदोलनासाठी भूमीपुत्रचे राज्य प्रवक्ते डॉ. जितेंद्र गवळी, जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव आरु, जिल्हा प्रवक्ता देव इंगोले, रिसोड तालुकाध्यक्ष श्रीरंग नागरे, वाशीम तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे, मालेगाव तालुकाध्यक्ष नागेश इंगोले, युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर बोरकर, ग्यानदेव भुतेकर, गजानन पोफळे, सचिन काकडे, रवी जाधव, पवन खोंडकर, विष्णू सरकरटे, संतोष खरात, महावीर सिंग ठाकूर, दत्तराव खानझोडे, शिवाजी कढणे, राजू डांगे, अमोल बाजाड, अर्जुनराव तुरूकमाणे, सतिष गंगावणे, शत्रूघन अवचार, बंडू जाधव, बंडू अवचार, जगदिश अवचार, गजानन सयाजी आरु, बालाजी बोरकर, राम अवचार, ज्ञानेश्वर वाघ, विठ्ठल अवचार, संतोः अवचार, रवी अवचार, विशाल मापारी, शंकर गिर्हे, आयजी बोडे, सुनील शिंदे , गजानन वाघ बाळासाहेब बोडखे मदन बोडखे
अभिषेक देशमुख,राहुल डांगे,ऋषिकेश देशमुख,उमेश राईटकर,रवी गाडे,समाधान गाडे,सचिन गाडे,गणेश माने,मयुर हिवाळे,ज्ञानेश्वर कांबळे,अमोल डांगे,संतोष पाटील,शुभम कदम,समाधान खळबर,अभिषेक कोरडे,पवन खोडके,वैभव कांबळे
,विश्वास चव्हाण,भगवान राऊत,अविनाश पाटील,महादेव पाटील,विष्णू मुंडे,आशिष चोपडे,भगवान पाटील,गोरख डांगे,शिवराज खिराडे,विकास खानखेडे,धर्मपाल वाकळे,मदन बोडखे,बाळासाहेब बोडखे
अजय बोडके यांच्यासह शेकडो, पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here