विठ्ठल अवताडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधि
विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असणारे संत नगरी शेगाव श्री गजानन महाराज संस्थान मध्ये आज श्रींचा ११२ वा ऋषीपंचमी उत्सव साजरा करण्यात आला या निमित्त विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून भकांच्या पैदल दिंड्यांचे संत नगरीत आगमन झाले असून २८ तारखे पासून श्री गजानन महाराज संस्थानचे वतीने कार्यक्रम आणि महायज्ञ सुरू होते.
आज शहरातून राजवैभवात दुपारी २ वाजता गज अश्व मेना टाळमृदंग गजरात नगर परीक्रमा निघाली या वेळी शहरात विविध ठिकाणी भाविकांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे तर येणाऱ्या सर्व पलख्यांची संस्थांचे वतीने वेवस्ता करण्यात येत असते ही परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे कोरोणा नंतर या वर्षी भाविकांमध्ये उत्साह असल्याचे दिसते