विदर्भाची प्रति पंढरी शेगाव ते देशाची पंढरी पंढरपूर अशी सरळ रेल्वे गाडी सुरू करण्यात यावी याकरिता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत आपण लवकरच भेट घेणार असलेल्या ची माहिती .खासदार प्रतापराव जाधव

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

. शेगावखासदार प्रतापराव जाधवयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विश्राम भवन सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी त्यांनी परळी ते अकोला पर्यंत धावणारी पॅसेंजर शेगाव पर्यंत वाढविण्याकरिता प्रयत्नशील राहणार असल्याचेही बोलताना सांगितले

खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळी वैजनाथ ते अकोला ही ट्रेन अकोला येथे चार तास उभी राहते त्यामुळे ती ट्रेन शेगाव पर्यंत वाढविण्याकरिता आपण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती

जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे विश्राम भवन या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी पत्रकार परिषदेला आमदार व माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा प्रमुख शांताराम दाणे पाटील उपजिल्हाप्रमुख राजीव पाटील मिरगे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर धारकर शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Comment