विदर्भ क्षेत्राच्या विकासाकरिता अतिरिक्त निधी द्या-आ.कोरेटे

 

 

शैलेश राजनकर गोंदिया

 

देवरी,दि.14 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गोंदिया जिल्ह्यातील समस्या मांडून क्षेत्राचा सर्वागिण विकास घडवून आणण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात यावे, अशी मागणी केली. या संदर्भात मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून विनंती केली.
आमगांव/देवरी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीन विकासाकरिता ३१ करोड. रुपयाच्या निधीचे प्रस्ताव शासनाला सादर केले आहे. या प्रस्तावामध्ये विधानसभा क्षेत्रातील देवरी नगरपंचायत, सालेकसा नगर पंचायत व आमगांव नगर परिषद ह्या विकासाच्या दृष्टीकोनातून माघारल्या आहेत. राज्यातील इतर क्षेत्राच्या तुलनेत विकास झालेला नाही. आजही या क्षेत्रात रस्ते, नाली व अन्य मुलभूत सोयी सुविधा तसेच आवश्यक विकासकामाकरीता निधीची आवश्यकता आहे. यासाठी क्षेत्राचे आमदार यांनी विधीमंडळाच्या सत्रादरम्यान मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून क्षेत्राच्या विकासासंदर्भात चर्चा केली. तसेच अतिरिक्त निधी देण्यात यावा, अशी विनंती केली

Leave a Comment