वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार सुहासआण्णा कांदे यांना निवेदन

 

सचिन पगारे
नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण-जातेगाव परिसरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सदर समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार सुहास आण्णा कांदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि विविध समस्यांबाबत चर्चा केली.

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण ,जातेगांव, गोंडेगाव व ढेकू येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने तालूक्याचे आमदार सुहासआण्णा कांदे यांची भेट घेतली.

बोलठाण येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रलंबित स्मशानभूमीसाठी आवश्यक जमीनीच्या मागणी संदर्भातील निवेदन सदर शिष्टमंडळाने आमदार कांदे यांना दिले आणि वीरशैव लिंगायत समाजाच्या समस्यांवर चर्चा केली.

आमदार कांदे यांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध समस्या जाणून घेतल्या व शिष्टमंडळास लवकरात लवकर मदतीचे आश्‍वासन दिले.

ही बातमी खूप महत्त्वाची आहे आवर्जून पहा

https://www.suryamarathinews.com/post/8125

यावेळी शिवनाथ बोबडे, राजेश बोबडे, कैलास वाळेकर, संजय गोंधळे, जनार्दन बोबडे, बाळू वाळेकर, प्रकाश बोबडे, जीवन बोबडे, पोपटआप्पा गर्जे,पोपट आप्पा बोबडे, विजय गोंधळे, रमेश आप्पा बोबडे, बाळकृष्ण बोबडे, शिवनाथ वाळेकर, भोलेहर गवंडर, सुधीर होनराव, नंदू गोंधळे, स्वप्नील बोबडे, सागर बोबडे, विलास वाळेकर, जगदीश गर्जे, रमाकांत तांबोळी ,महेश वाळेकर, गणेश तांबोळी अनिलआप्पा गर्जे आदी उपस्थित होते .

Leave a Comment