Home गोंदिया वृक्षलागवडीसोबत संवर्धन महत्वाचे-अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी

वृक्षलागवडीसोबत संवर्धन महत्वाचे-अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी

236
0

 

शैलेश राजनकार गोंदिया

देवरी,दि.२६ : आज वृक्षलागवड काळाची गरज झाली आहे. वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे त्याचे परिणाम दिसून येत आहेत.दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे.एकीकडे कोरोनाची महामारी तर दुसरीकडे वृक्षांची घटती संख्या यावर मात करण्यासाठी वृक्ष लागवडीसोबतच वृक्षांचे संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.
आज २६ सप्टेबंर रोजी देवरी शहरातील नगरपंचायत क्रिडागंणावर पोलीस विभागाच्या वतीने वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत ७० झांडाचे वृक्षारोपण करण्यात आले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून पोलीस अधिक्षक कुलकर्णी बोलत होते. यावेळी पोलीस विभागातील देवरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित कदम, पी.आय.देसुरकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव व पोलीस कर्मचार्यांची प्रमुख उपस्थिती होती.

Previous articleसंत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
Next articleहलबीटोला येथे कार्यानुभवातून धानावरील रोगाचे मार्गदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here