वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे सरदार वल्लभ भाई पटेल पोलिस /सैनिकी भरती पुर्व प्रशिक्षण संस्थेचे उत्साहात उदघाटन

 

वैजापूर तालुका प्रतिनिधी -ऋषी जुंधारे

ग्रामीण भागातील विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त व काटक असूनही पोलीस व सैनिक भरती मधील बारकावे व शैक्षणिक ज्ञान व अभ्यासाचे तंत्र याबाबत पुरेशा माहिती अभावी विद्यार्थ्यांना परिश्रम करूनही संधी मिळत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी नालेगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण व या क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विश्वात्मा फौंडेशन औरंगाबाद संचलित सरदार वल्लभ भाई पटेल पोलिस /सैनिकी भरती पुर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरु करण्यात आली आहे. यावेळी राजेश भोसले पाटील ( संचालक डिफेन्स करियर ॲकॕडमी औरंगाबाद ) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. चंद्रकांत गायकवाड (अध्यक्ष विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद ) हे होते तर प्रमुख अतिथी श्री.वाल्मिक सुरासे (सचिव विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद ) श्री.मनोज पाटील (अध्यक्ष शिक्षक क्रांती संघटना औरंगाबाद ) ,श्री. विजय द्वारकुंडे ( अध्यक्ष ज्ञानकुंज शिक्षण संस्था औरंगाबाद ) हे होते . कार्यक्रमासाठी महेश उबाळे ( अध्यक्ष चंद्रकला शिक्षण संस्था खांडी पिंपळगाव ), श्री.विजय खेडकर ( मु.अ.भगवान हायस्कुल अजब नगर ) विशाल भैय्या सुरासे (संचालक विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद ) श्री.सुधाकर बन्सोडे, बाजीराव भुतेकर ( प्रशिक्षक इदिरा गांधी सैनिकी शाळा ) द्वारकादास तांबे, श्री .दत्ताञय सुरासे (संचालक विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद )श्री. योगेश वैष्णव (पोलिस पाटील नालेगाव ) श्री.मधुकर ञिभुवन,श्री.हजारे बी.एम.(मु.अ.भा.मा.वि.नालेगाव) तसेच भागीरथी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री.प्रमोद पठारे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.भरत निंबाळकर यांनी केले.

Leave a Comment