ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी
वैजापूर
दि.१३- वैजापूर तालुक्यातील सर्वच वाहतूक रस्ते दुरवस्थेमुळे खिळखिळे झाले आहेत.दुरुस्तीसाठी वैजापूर तालुका कृती समितीचे वैजापूर तहसिल कार्यालय समोर साखळी उपोषण करण्यात आले आहेत. प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्यासाठी नागरिक व तरूणांनी हा सनदशीर मार्ग अवलंबला असल्याची माहिती आंदोलक तरूणांनी दिली.त्या माध्यमातून वैजापूर तालुक्यात असलेले सर्वच रस्ते त्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद औरंगाबाद, सर्व विभागाचे नियंत्रण व देखभालीची जबाबदारी असलेले रस्ते यावर कोट्यवधी रुपये खर्च होऊन ही रस्त्याची दुरवस्था झाली असून झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासकीय यंत्रणाच सर्वस्वी जबाबदार असल्याने त्यास जागी करण्यासाठी तरुणांनी एकत्रित येऊन वैजापूर तालुका कृती समिती तयार केली आहे.
निकृष्ट दर्जाच्या कामांना नियमित करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे,आदी मागण्यांसाठी नारायण कवडे,दामोधर पारीक, प्रवीण सावंत, ज्ञानेश्वर आदमाणे, बिपीन साळे, लक्ष्मण काळे, आदींनी नायब तहसीलदार रमेश भालेराव, महेंद्र गिरगे यांना निवेदन देत उपोषण सुरू केले आहे.