शरद पवारांना मानणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी हिंगणघाट विधानसभेत भरले प्रतिज्ञापत्र.प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी घेतला पुढाकार….

 

प्रमोद जुमडे हिंगणघाट/वर्धा

हिंगणघाट:- अजित पवारांच्या बंडा नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष कोणाच्या यासाठी म्हणून प्रतिज्ञापत्रे भरणे सुरू आहे या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या पुढाकाराने शरदचंद्र पवार यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून हजारो कार्यकर्त्यांनी प्रतिज्ञापत्र भरले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकनेते मा शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारधारेला मानणारे सर्व पदाधिकारी व प्रमुख सदस्यांनी प्रतिज्ञापत्र भरत आम्ही शरद पवार यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले.

‌ यावेळी प्रतिद्यापत्र ऑफीडेविट करून नोटरी‌ करण्यात आली.खासदार शरद पवार यांच्या विचारांना मानणारे मोठ्या संख्येने पदाधिकार्यानी प्रतिज्ञापत्र भरण्यास गर्दी केली होती.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग,नागपूर विभागीय अध्यक्षा डॉ सुरेखा देशमुख, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,अमोल बोरकर, अल्पसख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जावेद मिर्झा, माजी नगसेवक बालाजी गहलोत,माजी नगसेवक अनिल भोंगाडे, सुनील भूते, महिला जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभूळकर,महिला विधानसभा अध्यक्ष निता गजबे, उपाध्यक्ष सिमा तिवारी, शहराध्यक्ष मृणाल रिठे, तालुका अध्यक्ष शगुप्ता शेख, तालुका उपाध्यक्ष मिनाक्षी धाकणे, तालुका सचिव सुचिता सातपुते, शहर सचिव अर्चना नांदुरकर, भारती घुंगरूड, दिपाली रंगारी, युवती शहराध्यक्ष माधवी देशमुख, उपाध्यक्ष आचाल पाटील,गोमाजी मोरे, किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष किशोर चांभारे, विधानसभा अध्यक्ष सुधाकर वाढई, अल्पसंख्यांक जिल्हा महासचिव नदीम शेख,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष बबलू शेख,अजय पर्बत,अमोल मुडे, नितीन भूते, पप्पु आष्टीकर,मारोती महाकाळकर, जगदीश वांदिले, प्रवीण श्रीवास्तव, राजू मेसेकर,प्रल्हाद तुराले, संजय गाभुळे, प्रवीण रघाटाटे, गंजु महाकाळकर, आशिष मंडलवार, पुरुषोत्तम कांबळे, उमेश नेवारे, सुशील घोडे, शेखर ठाकरे, वैभव साठोने, पंकज भट्ट, नितेश नवरखेडे, सुनील ठाकरे, निखिल भांनखेडे, दीपक चांगल, प्रवीण जनबंधू सह हजारोच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…

Leave a Comment