Home बुलढाणा शहरी भागा प्रमाणे ग्रामीण भागात ही आठवडी बाजार ला परवानगी द्या ,

शहरी भागा प्रमाणे ग्रामीण भागात ही आठवडी बाजार ला परवानगी द्या ,

320
0

 

जिल्हाधिकारी यांच्या कडे मांगनि ,

बुलडाणा , जिल्ह्यात लोकडाऊन सुरू झाल्या पासून भरणारे सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले होते मात्र आता बुलडाणा , चिखली , मेहकर , देऊलगावराजा , लोणार , या ठिकाणी आठवडी बाजार भरण्यास सुरवात झाली असून शहरी भागा प्रमाणे ग्रामीण भागात ही आठवडी बाजार सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मांगनि जिल्हा आठवडी बाजार संघर्ष समिती चे अध्यक्ष अमीन शाह यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे ,

ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे , पोटाची खळगी भरण्यासाठी काही व्यापारी ग्रामीण भागात जातात मात्र तेथे त्यांना गावात फिरण्यास मनाई करण्यात येते लहान व्यापाऱ्यांना मज्जाव करण्यात येत असून लहान व्यापार करणाऱ्या समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे , आता परिस्तिथी बदलली असून बस सेवा , व इतर सर्व दुकाने उधडण्यास शासनाने परवानगी दिली आहे , याच प्रमाणे ग्रामीण भागातील लहान बाजारांना परवानगी देण्यात यावी जिल्हाधिकारी यांनी लक्ष केंद्रित करावे व आमचं उपजीविकेचा प्रश्न निकाली काढावा अशी मंगणी निवेदनात करण्यात आली आहे ,

——–//—————//————–//

आठवडी बाजार बंद झाल्या मूळे आम्ही किरकोळ छोट्या व्यापाऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून आमची आर्थिक परिस्तिथी खालावली आहे कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे , शासनाने आमचा विचार करावा व आठवडी बाजाराला परवानगी द्यावी ,

कृष्णा मिसाळ ,

चिवडा विक्रेता आठवडी बाजार ,

आठवडी बाजार बंद असल्या मुळे माझ्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली होती उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता आता शेतात सोयाबीन सोंगणी सुरू झाल्या मूळे मी माझ्या कुटुंबीया सह सोयाबीन सोंगणी करायला जात आहोत शासनाने आमचा विचार करून बाजाराला परवानगी द्यावी ,

शेख नासिर

मसाला विक्रेता ,

Previous articleउत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनिषा वाल्मिकी तरुणीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होण्यासंदर्भात शेगाव येथील समस्त नवयुवक वाल्मीकि समाज मित्र परिवार व् समस्त एकता ग्रुप शेगांव यांचे वतीने मेणबत्ती लावून श्रध्दांजली
Next articleनक्षलग्रस्त क्षेत्र के सुशिक्षित युवक रोजगार के अवसर का ले लाभ- पुलिस अधीक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here