शहर पोलिस स्टेशन शेगांवचे ठाणेदार श्री सुनिलजी अंबुलकर यांचा पतंजलि परिवार व गो ग्रीन फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सत्कार संपन्न

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव – श्री सुनिलजी अंबुलकर साहेब हे शेगांव शहर पोलिस स्टेशनच्या ठाणेदारपदी रूजू झाल्याबद्दल पतंजलि योग परिवार बुलडाणा जिल्हा व गो ग्रीन फाऊंडेशन शेगांवच्या संयुक्त विद्यमाने भट्टड जिन, शेगांव येथे दि. 1 ऑगस्ट रोजी किशोरजी कुळकर्णी प्राचार्य चिन्मय विद्यालय, शेगांव यांच्या अध्यक्षतेखाली, प्रल्हादजी सुलताने प्रांत सहकोषाध्यक्ष महाराष्ट्र (पूर्व) यांच्या शुभहस्ते व रमेशचंद्रजी भट्टड उद्योजक व नित्ययोग वर्ग भट्टड जीनचे आधारवड, चतुर्भूजजी मिटकरी जिल्हाप्रभारी भारत स्वाभिमान बुलडाणा जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

विशेष उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वरजी मिरगे, कमलाकर चव्हाण, पुरूषोत्तम पिसे, जिल्हाप्रभारी किसान सेवा समिती, दशरथ लोणकर जिल्हा प्रभारी, हरिदास सोळंके जिल्हाप्रभारी युवाभारत, विनायकराव भारंबे जिल्हा प्रभारी सोशल मिडीया, निळकंठराव साबळे कोषाध्यक्ष, बाबुराव रोकडे महामंत्री, सुनिताताई चांडक महिला जिल्हाप्रभारी, कल्पनाताई मसने महिला सरचिटणीस भाजपा, वर्षाताई सरप महिला तहसिल प्रभारी व गो ग्रीन मंडळ हे होते.

कार्यक्रमाची सुरूवात श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. प्रकाशजी झामरे राज्यपुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या सुरेल आवाजातील स्वागत गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले. सत्कारमुर्ती श्री सुनिलजी अंबुलकर साहेबांचा परिचय वृक्षमित्र विठ्ठलराव मिरगे सरांनी करून दिला.

अंबुलकर साहेबांचा सत्कार प्रल्हाद सुलताने प्रांत सहकोषाध्यक्ष महाराष्ट्र (पूर्व), किशोरजी कुळकर्णी, रमेशजी भट्टड, चतुर्भूज मिटकरी यांनी शाल, श्रीफळ देवून केला. बुलढाणा जिल्हा पतंजलि परिवाराच्या वतीने सर्व जिल्हा प्रभारी, महिला जिल्हा प्रभारी, महिला तालुका प्रभारी यांच्या वतीने तर गो ग्रीन फाऊंडेशनच्या टिमच्या वतीने शाल श्रीफळ देवून करण्यात आला.

प्रल्हाद सुलताने, ज्ञानेश्वरजी मिरगे, किशोरजी कुळकर्णी यांची समायोचित भाषण झालीत. सुनिलजी अंबुलकर साहेबांनी सत्काराला उत्तर देतांना पर्यावरण रक्षक गो ग्रीन, आरोग्य रक्षक पतंजलि व सामाजिक सुरक्षा रक्षक पोलिस खाते या त्रिवेणी संगमाचे कौतुक केले व भविष्यात असेच समजोपयोगी कार्य एकत्रितपणे करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन हरिषजी चिंचोलकर सर यांनी केले. आभारप्रदर्शन दिपक सरप सर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतंजलि परिवारातील सदस्यांनी व गो ग्रीन फाऊंडेशनच्या टिमने अथक परिश्रम घेतले.

Leave a Comment