शालेय क्रीड़ा स्पर्धेत महेश ज्ञानपीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी नवा विक्रम नोंदवीला

प्रतिनिधि सचिन वाघे

हिंगनघाट :- शालेय क्रीड़ा मध्ये तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि राज्य स्तरावर शाळेचा नाव लौकिक करण्यात विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले
वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदा इतकं मोठं विक्रम करणारी शाळा महेश ज्ञानपीठ ठरली आहे.

आजच्या जगात विद्यार्थ्यांच मैदानी खेळात मन नाही लागतं तरी त्यांचे क्रीडा प्रशिक्षक मुस्तफा बख्श नेहमी विद्यार्थ्यांना मैदानी खेळात प्रशिक्षण देऊन त्यांना शारीरिक मजबूत करतात.

महेश ज्ञानपीठ हायस्कुल आणि ज्यू. कॉलेज,हिंगणघाट च्या खेळाडूंची शालेय स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड फुटबॉल , हॉकी , क्रिकेट , योगा ,चेस , कराटे , बॉक्सिंग , एथलेटिक , ज्यूदो , कुश्ती , कॅरम इत्यादी विविध खेळात एकूण 105 खेळाडू विभागीय स्तरावर तर 22 खेळाडूंची राज्यस्तरावर
निवड झालेली आहे.

वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट ची महेश ज्ञानपीठ शाळा एकमात्र शाळा ठरली.

विभागीय स्तर आणि राज्य स्तरावर खेळाडूंची निवड झालेली शाळा महेश ज्ञानपीठ जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.

शालेय क्रीडा मध्ये इतका मोठा विक्रम नोंदवणारया शाळेचे क्रीडा प्रशिक्षक मुस्तफा हबीब बख्श क्रीडा क्षेत्रात मोठं नाव आहे,
विभागीय स्तर, राज्यस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंनी विजयाचे श्रेय शाळेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष गिरधरबाबु राठी, संचालक मंडळाचे सर्व सदस्य , प्राचार्या वैशाली पोळ , उपप्राचार्य दिगांबर खटी, जिल्हा क्रीड़ा अधिकारी लेकुरवाड़े मॅडम , क्रीड़ा अधिकारी निमगडे सर, तालुका संयोजक खांडरे सर, तथा क्रीड़ा शिक्षक मुस्तफा हबीब बख्श, सचिन मुळे , प्रणिता चिंतलवार व सर्व शिक्षक वृंदाना दिले
त्यांचे यशाबद्दल सर्व स्तरावरुण अभिनंदन करण्यात येत आहे

Leave a Comment