सिल्लोड प्रतिनिधी सागर जैवाळ
_कृषिदूताचा ग्रामस्थ शेतकऱ्यांना सल्ला_
महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी संलग्नित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव अंतर्गत ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी-औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम जुलै 2021 पासून विविध गावांमध्ये राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील कृषिदूत योगेश परसराम नवल याने रहिमाबाद येथील शेतकऱ्यांना मृदा परीक्षणासाठी माती नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
रासायनिक खतांचा अति वापर , वर्षानुवर्षे पीक लागवड यामुळे मातीची सुपिकता कमी होत आहे तसेच त्यासाठी माती मध्ये कोणती मूलद्रव्ये कमी आहेत तसेच कोणते घातक घटक आहेत याची माहिती असणं हे खूप गरजेचं आहे . ही माहिती माती परीक्षणामुळे मिळू शकते व त्यानुसार आपण मातीमध्ये योग्य ती मूलद्रव्ये सोडू शकतो.जास्तीत जास्त सेंद्रिय खते वापरण्याचा सल्ला योगेशने या ठिकाणी शेतकऱ्यांना दिला. याप्रसंगी त्याने मृदा परीक्षणासाठी माती नमुना शास्त्रीय पद्धतीने कसा घ्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच सदर माती नमुना हा कृषी महाविद्यालयात परीक्षणासाठी पाठवण्यात आला .शेतकऱ्यांनी त्याचे कौतुक करत अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी दादाराव मोरे, भगवान मोरे ,वैभव मोरे, गणेश मोरे , इत्यादी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. यासाठी योगेशला प्रा.ए. डी.फापळे, प्रा. बी.बी.मुंडे आणि प्रा.मोनिका नाफडे-भावसार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.