शासनाच्या योजना भाजप पक्षाच्या आहे का ? . शिवसेना आक्रमक

 

सचिन वाघे प्रतिनिधी

दि. 8 डिसेंबर
हिंगणघाट :- शिवसेना च्या वतिने जिल्हाधिकारी यांना निवेदनातून तक्रार करण्यात आली , शहरात पाच ते सहा महिण्यापुर्वी पासून कुठल्याही शासकीय योजना ज्या गरजू व गोरगरीबांकरीता अंमलात आणल्या जातात,

जसे दिवाळीपूर्वी कामगार कल्याण, वर्धा या विभागाद्वारे गवंडी कामगार तथा इमारत बांधकाम मजूर यांना साहित्य व पेटी वाटप कार्यक्रम निखाडे सभागृह येथे घेण्यात आला.

तसेच शहरातील रेशन दुकानातून दिवाळी साजरी करण्याकरीता आनंदाचा शिक्षा ही किट 100/- कमी दरामध्ये वाटप करण्यात आली व आता काही दिवसापुर्वी शिवसुमन मंगल कार्यालय, हिंगणघाट येथे महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) द्वारे आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या वतिने शिक्षणाकरीता टॅब देण्यात आले आहे.

अशा शासनाच्या योजना आहे. त्या सर्व योजनेचे लाभार्थ्यांना साहित्य वाटप झाले त्यावेळी शिवसेना पक्षाच्या असे निदर्शनास आले की सदर योजना हया शासनाच्या नसुन एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या (भाजपा) आहे. कारण जेव्हा कामगार कल्याण कार्यालय, वर्धा यांनी निखाडे सभागृह मध्ये कार्यक्रम आयोजीत
केला त्या ठिकाणी लोक प्रतिनीधी म्हणून आमदार प्रमुख पाहूणे असणे गैर नाही.

परंतू त्या ठिकाणी बॅनर व
पक्षाचे झेन्डे व पक्षाचे इतर पुर्ण प्रतिनीधी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडतो. परंतू सदर कार्यक्रमात
शासकीय अधिकारी व कर्मचारी कुठेही दिसुन येत नाही. तसेच शिवसुमन मंगल कार्यालय, हिंगणघाट महाज्योतीच्या
वतिन विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण केले तेव्हाही पक्षाचे बॅनर व झेन्डे लावण्यात आले होते. व त्याचे पक्षाचे सर्व प्रमुख
पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावरून असे निदर्शनास येते की, सदर कार्यक्रम हा शासकीय नसुन एका
विशिष्ट राजकीय पक्ष भा.ज.पा. चा आहे असे लक्षात येते.
तरी सदर शासनाचा निधी असला तरी तो निधी सर्वसामान्य जनतेचा आहे. हया ठिकाणी भा.ज.पा. आपली राजकीय पोळी शेकत आहे. त्यांच्या या सर्व कृतीमुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जात आहे.

व हा प्रयोग कुठेतरी थांबला पाहिजे अन्यथा शिवसेनेद्वारा उग्र आंदोलन करण्यात येईल. यापुढे सदर कार्यक्रम पुनःश्च झाला तर याला आपली मुकसंमती समजण्यात येईल, व सदर कार्यक्रम उधळून लावण्यात येईल.

त्याची जबाबदारी आपली स्वतःची राहील. शिवसेनेचे शिष्टमंडळ जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांच्या नेतृत्वात तथा तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहरप्रमुख सतीश ढोमणे, उप तालुकाप्रमुख प्रकाश अनासाणे,नगरसेवक मनीष देवडे,त बंटी वाघमारे इत्यादी शिवसैनिकासह निवेदन देण्यात आले व योग्य तो न्याय मिळावा

Leave a Comment