शुक्रवार रात्रीपासून पातूर्डा जिल्हा परिषद सर्कल सह संग्रामपूर जळगाव व शेगाव तालुका जिल्हा बुलढाणा मुसळधार पावसाचा कहर, त्यामुळे नदी नाल्यांना आला महापूर
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी दिल्या अनेक गावांना भेटी..
तालुक्यातील शेकडो गावात पुराचे पाणी शिरल्याने जनजिवन विस्कळीत
झाले
हजारो एकर जमीन पिकांसह खरडुन गेल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले.
शेतकरी शेतमजुरांना मुसळधार पावसाचा फटका शेतपिकाच्या नुकसानसह मोठ्या प्रमाणात घराची पडझड सुद्धा झाली त्याचबरोबर गुराढोरांच्या चाऱ्याचे व गुराढोरांच्या गोठ्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरातील सर्व सामानाचे व धान्याचे सुद्धा नुकसान झाले.
काही घरे जमीनदस्त तर काही घरांची प्रचंड प्रमाणात पडझड झाली
काही ठिकाणी जनावरे व शेती साहित्य नदीच्या पुरात वाहून गेले
सरकारने कोणत्याही प्रकारचे निकष न लावता सरसकट नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना यांना आर्थिक मदत देण्यात यावी