Home बुलढाणा Gharkulyojna/घरकुल योजनेतील अनियमिततेविरोधात डॉ बच्छिरे यांचा एल्गार

Gharkulyojna/घरकुल योजनेतील अनियमिततेविरोधात डॉ बच्छिरे यांचा एल्गार

 

घरकुल योजनेतील अनियमिततेविरोधात शिवसेना उ.बा.ठा. आक्रमक; १५ दिवसांत माहिती न दिल्यास लोणार नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा जिल्हा संघटक डॉ. गोपालसिंह बछिरे यांनी दिला

​लोणार:नगरपरिषद हद्दीमध्ये रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत झालेल्या कामांमध्ये पारदर्शकता राहावी आणि लाभार्थ्यांना मिळालेल्या अनुदानाची सविस्तर माहिती समोर यावी, यासाठी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या वतीने लोणार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना कडक इशारा देणारे निवेदन सादर करण्यात आले.

All Sikh sikhaligar/ ऑल सिख-सिकलीगर असोसिएशन (आसा)ची महाराष्ट्र स्तरीय बैठक बडनेरा येथे उत्साहात संपन्न

​निवेदनात नमूद केल्यानुसार, सन २०२१ ते सन २०२५ या कालावधीत रमाई आवास योजना आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सर्व घरकुलांची सविस्तर व साक्षांकित (Attested) माहिती मागवण्यात आली आहे. यामध्ये सर्व घरकुलधारकांचे स्थळ निरीक्षण अहवाल त्यासोबत जोडलेली छायाचित्रे, लाभार्थ्यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि आजपर्यंत कोणत्या लाभार्थ्याला किती अनुदान मिळाले, याच्या धनादेशाच्या तारखांसह संपूर्ण माहितीचा समावेश आहे.panchayatsamiti

​पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, येत्या १५ दिवसांच्या आत ही सर्व माहिती साक्षांकित करून नगरपरिषदेने उपलब्ध करून द्यावी. ठरलेल्या मुदतीत माहिती न मिळाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोणार नगरपरिषदेच्या प्रांगणात तीव्र ठिय्या आंदोलन छेडले जाईल. एवढेच नव्हे तर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना मुख्य द्वारातून आत प्रवेश करू दिला जाणार नाही, असा थेट इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.lonarnews

Gharkulyojna/​या निवेदनावर जिल्हा संघटक डॉ. गोपालसिंह बछिरे, शहर प्रमुख गजानन जाधव सर, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे सर, युवा शहराधिकारी श्रीकांत मादनकर, शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख तानाजी आंभोरे, इक्बाल कुरेशी, अश्पाक खान, योगेश भूक्कन, गोपाल मापारी, शे. सादेक शे. जमीर, शेख इक्बाल, ओवेस कुरेशी, ज्ञानेश्वर दुधामोगरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नगरपरिषद प्रशासन आता यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.