सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
शिंदी येथे दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनानिमित्त ग्रामपंचायत भवनामध्ये जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आलायावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी सहाय्यक शरद पवार कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे सरपंच विनोद खरात माझी सरपंच अशोक खरात हे उपस्थित होते !यावेळी कृषी सहाय्यक शरद पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की चार ते पाच वर्षांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मातीचे परीक्षण हे केले पाहिजे !व प्रत्येकाने सेंद्रिय शेती करावी असे आवाहन यावेळी त्यांनी केले !त्यानंतर कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे यांनी सांगितले की !प्रत्येक शेतकऱ्यासाठी मातीचे परीक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक शेतकऱ्यांनी मातीचे परीक्षण करून घ्यावे !यावेळी सरपंच विनोद खरात तसेच अशोक खरात यांचेही थोडक्यात भाषणे झाली !यावेळी सुनील खंडारे ‘ पत्रकार सचिन खंडारे .उत्तम बंगाळे ‘ विष्णू बंगाळे ‘ वसंता बंगाळे ‘संतोष बाजीराव बंगाळे ‘गजानन भांड ‘ भगवान बरकूल ‘आधी शेतकरी या वेळी उपस्थित होते !