शिंदी येथे पल्स पोलिओ अभियान !सरपंचाच्या हस्ते डोज पासून सुरुवात !

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी या गावांमध्ये 31 जानेवारीला 0 ते 5 वर्षा खालील वयोगटातील लहान बालकांना पल्स पोलिओ पाजण्याचे काम प्राथमिक आरोग्य उपकेंद्र शिंदी येथे सुरू झाले !या वेळी शिंदी गावचे प्रथम नागरिक सरपंच विनोद खरात यांच्या हस्ते पल्स पोलिओचा डोज पाजून पोलिओ लसीकरणाला सुरुवात करण्यात आली !येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये ‘तसेच शिंदी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुद्धा ‘ पल्स पोलिओच्या लसीकरणाची तयारी करण्यात आली होती ‘यावेळी शिंदी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत वायाळ ‘सेविका ज्योती चांगडे .आशा स्वयंसेविका उर्मिला बुरकुल ‘ पिटिएल ‘ गीता बुरकुल ‘पत्रकार सचिन खंडारे ‘अजय खंडागळे ‘आदी आरोग्य कर्मचारी व मान्यवर यावेळी हजर होते ‘यावेळी गावातील जवळपास अंदाजे ५०० मुलांना पोलिओ चा डोज पाजण्यात आला !

Leave a Comment