शिंदे गटात गेल्याने ग्रामीण भागातील जनता नाराज.

 

दिपक देशमुख
मेहकर

मेहकर तालुक्यातील आमदार आणि खासदार शिंदे गटात गेल्याने अनेकांनी सोडली साथ.

मेहकर तालुक्यातील आमदार संजय रायमुलकर हे शिंदे गटात गेल्याने मतदार राजा यांना न सांगता शिंदें गटात गेल्याने काही शिवसैनिक यांनी फोन लावले कि आपण शिवसेना सोडुन जायायला पाहिजेत नव्हते तेव्हा त्यांनी स्थानिक मेहकर मध्ये नाराजी असल्याने गेलो मात्र नंतर सावरा सावर करुन माझी कामे होत नव्हती आम्हाला मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटु देत नव्हते म्हणून आम्ही शिवसेना सोडली असे कारणे नागरिक यांना सांगण्यात आली मात्र या अगोदर शिवसेनेत आपण दोन ते तीन टर्म आपण आमदार होते तेव्हा नाराजीचे सुर आले नाही मात्र या आडीच वर्षात काय झाले शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी सर्व आमदार यांना फोडुन मुख्यमंत्री पदावरुन त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि आपण त्यामध्ये शिवसैनिक यांनी निवडणू दिले होते आपण हि गेल्याने मेहकर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील नागरिक नाराजीचे सूर काढत आहे
नंतर आमदार यांच्या पाठोपाठ खासदार प्रतापराव जाधव हे हि शिंदे गटात गेल्याने कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या मुखातून नाराजीचे सूर निर्माण होत आहे भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने राज्यातील शिवसेनेतून फुट पाडुन राज्यातील सत्ता घडवुन आणली त्या मुळे अनेक शेकडो कार्यकर्ते यांचे लक्ष खासदार प्रतापराव जाधव यांच्या कडे होते मात्र तेही गेल्याने मेहकर मध्ये सभा घेऊन आपले म्हणोगत वक्त केले मात्र शिंदे गटात गेल्याने. मेहकर तालुक्यातील मतदार राजा हा शिवसेनेचा अनेक तालुक्यात आणि जिल्ह्यात शिवसेना बालिकिल्ला म्हणून ओळख आहे मात्र हे शिंदे गटात गेल्याने या बालिकिल्याला खिंडार पडण्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे अनेक जेष्ठ शिवसैनिक आणि नवयुवक नाराज आहेत

Leave a Comment