शिक्षकांना फोटोची सक्ती नको-अनिल आयस्कार

0
411

 

प्रतिकात्मक फोटोची सक्ती रद्द करा

योगेश नागोलकार

पातूर:- राज्यातील शाळांमध्ये चांगले शिक्षण देण्याऐवजी वर्गामध्ये वर्ग शिक्षकांचे फोटो लाऊन राज्य सरकारला काय साध्य करायचे आहे सध्या स्थितीत राज्याभर 25हजार शिक्षकांची पदे रिक्त असुन विद्यार्थीचे शिक्षका अभावी शैक्षणिक नुकसान होत आहे वर्गात फोटो लावण्यावरून
् सर्व शिक्षक वर्गात सध्या जोरदार चर्चा चालू आहे शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करून त्यांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुर्णपणे वेळ उपलब्द करून द्यावा अशी मागणी शिक्षकांकडून होत असून आता नवीन वादाची चर्चा सुरू झाली
वर्गात शिक्षकाचा फोटो लावण्याच्या
निर्णयावरून सध्या राज्यात वादंग उठले आहे तसेही खाजगी अनुदानित शिक्षणसंस्थामध्ये 1%अपवाद तोतया शिक्षकांची भरती आहे त्याकरिता सर्व शिक्षकांना याची सक्ती कशाला या तुघलकी निर्णयामुळे अनेक वाद उद्भभवू शकतात त्यामुळे या निर्णयावर बहिष्कार टाकण्याचे शिक्षक आघाडीने जाहीर केले असून शिक्षण आयुक्त सरजु मांढरे यांनी काॅन्फरणसिंगच्या माध्यमातून उपसंचालक यांना सुचना केल्या असल्याने उपसंचालक यांनी आपल्या विभागातील प्राथमिक/माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना कार्यवाही बाबत लेखी आदेश दिल्याने संबधित शिक्षणाधिकारी यांनी अधिकृत शाळा मुख्याध्यापक यांचे नावेच आदेश काढून वर्गात वर्ग शिक्षकांचे फोटो लावण्याचे आदेश दिले फोटो का व नेमका कशासाठी लावावा ही चर्चा शिक्षक वर्गात रंगत आहे तर शिक्षणाधिकारी यांनी फोटो लावल्या बाबत तसा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी सांगितले
सदर उपक्रमाला राज्यभरात विरोध होत असून शिक्षक आघाडीचाही विरोध आसल्याचे शिक्षक आघाडीचे अनिल आयस्कार यांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here