शिरपूर चेकपोस्टवर बेकायदेशीर वसुली सुरू,नाक्यावरील अधिकार्यांच्या चौकशीची मागणी

 

शैलेश राजनकर गोंदिया

महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवरील देवरी तालुक्यातील शिरपुर चेकपाेस्टवरील गाेदामात जाऊन फाइलच्या आडून पैसे दिल्यास काेणताही ट्रक तपासणीशिवाय घेऊन जाता येताे
मात्र, वाहनाचे वजन, कागदपत्रे, उंची यासंदर्भात थाेडेही चुकले तर अव्वाच्या सव्वा बेकायदेशीर वसुली हाेते.या वसुलीचे पैसे देण्यास नकार दिल्यास तुम्ही महाराष्ट्राच्या नव्हे तर पाकिस्तानच्या सीमेवर आहात, असा अनुभव येताे. आम्ही देशभर फिरताे; पण काेठेही इथल्यासारखा त्रास कुठेही नसल्याचे ट्रकचालक आपल्या आपबितीत सांगतात.त्यातच या नाक्यावर कार्यरत असलेल्या अधिकार्यांच्या व कंत्राटी कर्मचार्यांच्या आर्थिक बाबीची तपासणी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
देवरी तालुक्याच्या शिरपुर चेकपाेस्टवर २४ तासांमध्ये हजारो ट्रक कंटेनर ये-जा करतात. तासांच्या शिफ्टनुसार या नाक्यांवर काम चालते. खासगी राेजंदारी, पंटर यांच्या समन्वयातून या चेकपाेस्टवर वसुली केली जाते. शासनास चेकपाेस्टच्या माध्यमातून उत्पन्न तर मिळतेच; तसेच येथे कामावर असलेले कर्मचारीही दिवसभरात हमखास ते हजारो रुपयांची वरकमाई देखील करतात. त्यामुळे चेकपाेस्टवर न थकता २४ ते ४८ तास ड्यूटी करण्याची तयारीही येथील कर्मचारी ठेवतात. इलेक्ट्राॅनिक्स वजनकाटे लावल्याने आरटीओच्या वसुलीला काहीसा चाप लागला असला तरी वसुलीचे अनेक नवे मार्ग पुढे आले असल्याचे तिथल्याच रोजंदीरीत काम करणार्या व्यक्तिकडून सांगितले जात आहे.
सुत्रानीं दिलेल्या माहीतीनुसार तर पाच ते दहा हजाराची वसुली
वाहनाचा परवाना, वजन, उंची, चालकाचा परवाना, पीयूसी, इन्शुरन्स यापैकी एकाही कागदपत्रात त्रुटी असेल, तर ट्रकचालकांना तेथील कर्मचाऱ्यांना ५ ते १० हजार रुपयांपर्यंत पैसे देण्याची तयारी ठेवावी लागते.
केवळ वसुलीवर लक्ष महाराष्ट्र-छत्तीसगड देवरी तालुक्याच्या शिरपुरच्या सीमेवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दाेन्ही बाजूने तपासणीची नाके आहेत. नाक्यावर येणारी वाहने थेट वजनकाट्यावर उभी राहतात. इलेक्ट्राॅनिक्स काट्याची वाहनाच्या प्रकारानुसार ५५ ते १३२ रुपयांपर्यंत फी घेतली जाते. काट्यावरून जाणारी गाडी थेट कागदपत्रे तपासणीच्या कक्षापुढे उभी राहतात. चालक अथवा वाहक गाडी थांबवून फाइल घेऊन गाेदामातील एका कक्षात जातात. तेथे फाइलच्या आडून वाहनाच्या प्रकारानुसार २०० ते ६०० रुपयांपर्यंत पैसे दिले जातात. केवळ पैसे स्विकारून फाइल परत केली जाते. त्यानंतर वाहन मार्गस्थ हाेते.त्यात प्रत्यक्ष काेणता माल आहे, याची तापासणीच हाेत नाही.
..असे आहे बेकायदेशीर दरपत्रक
सर्व कागदपत्रे, वजन आदी तांत्रिक बाबी क्लिअर असल्यास
दहाचाकी वाहनाला २०० रुपये,
१२ ते १४ चाकी वाहनाकडून ५०० रुपये,
ट्रॉलाकडून तीन ते पाच हजार
अवैध ओव्हर हाइट, ओव्हर लाेड वाहने ५०० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत
ओव्हर हाइट-ओव्हर लाेडसाठी दंड…
ओव्हरलाेड, ओव्हर हाइट कंटेनर, ट्राॅला यांना नाक्यावर दंड करून १० हजार ते ५ हजारांपर्यंत चालान फाडले जाते. राज्यातून जाताना इतर नाक्यांवर पुन्हा तपासणी हाेण्याची शक्यता असल्याने नाक्यावर ताेडीपाणीची रिस्क घेतली जात नाही. वाहन काेठे जाणार आहे, याची माहिती घेतल्यावरच पुढील निर्णय घेतला जाताे. यावर आळा बसावा व शासनाचा महसुल वाचावा या करीता या प्रकारावर आळा घालण्याकरीता योग्य त्या ऊपाय योजना शासनाने कराव्या अशी मागणी शिरपुर चेक पोस्टच्या त्रासाला कंटाळून अनेक ट्रक चालक – मालक करीत आहेत.

Leave a Comment