Home Breaking News शिवजयंतीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा दूजाभाव – अमर पाटील यांचा आरोप

शिवजयंतीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचा दूजाभाव – अमर पाटील यांचा आरोप

641
0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी संभाजी ब्रिगेड नांदुरा च्या वतीने तहसील मार्फत मुख्यमंत्री यांना पत्र पाठविण्यात आले. मुख्यमंत्र्यांकडून लग्न कार्यास परवानगी आहे,शाळा महाविद्यालय सुरू आहेत,सर्व धार्मिक स्थळे सुरू आहे,बाजारपेठ खुल्या आहेत,आता कोरोनाची भीती सुद्धा राहिली नाही.जर कोरोनाला आळाच घालायचा होता तर तुम्ही स्वतः स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला २३ जानेवारीला लाखोंच्या संख्येने जमा होऊन पुतळ्याचे अनावरण कसे केले? ,जयंत पाटील यांचे हजारोंच्या संख्येनं दौरे कसे सुरू आहेत? ,वडेट्टीवार च्या सभेला परवानगी कशी? मग एवढं सर्व सुरू असताना आपण नेमकी शिवजयंतीला च परवानगी का नाकारली?,यामागे आपण केलेला दूजाभाव व पर्यायाने तिथीचा अट्टाहास तर नाही ना?.संपूर्ण जग तारखेनुसार चालते.आपण स्वतः मुख्यमंत्री महोदय सर्व कामकाज तारखेनुसार पार पाडता.तसेच दैनंदिन जीवन जगताना सुद्धा तारखेचाच वापर करता.तुम्ही स्व.प्रबोधनकारजी ठाकरे साहेब यांचे नातू आहात हे विसरू नका ही जात जोडून विनंती. हे सर्व काही सुरू असताना फक्त शिवजयंतीलाच बंधन का? आणि हा माझ्या एक्याचाच प्रश्न नसून तमाम शिवप्रेमींचा प्रश्न आहे.जर आपण हा निर्णय रद्द केला नाही तर शिवप्रेमींच्या भावनेचा उद्रेक होईल. आणि आपल्याला महाराष्ट्राच्या रोषाला सामोरे जावे लागेल. यामुळे आम्ही तुम्हाला नांदुरा मधे पाय टाकुु देणार नाही. तसेच शिवप्रेमी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. म्हणून मी आपणास विनंती करतो की आपण काढलेला शासकीय जी.आर.तात्काळ मागे घेऊन शिवजयंतीला खुली सुट द्यावी ही विनंती या आशयाचे पत्र तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष मंगेश सोळंके,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष अमोल भगवान पाटील,तालुका प्रसिद्धी प्रमुख हरिभाऊ जुमळे,उपाध्यक्ष सचिन बाठे,ऋषिकेश कोळस्कर,विठ्ठल भगत,शहरउपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,रघुनाथ गावंडे, माटोळा शाखाध्यक्ष सहदेव खराटे,सागर पाटील,तेजस पाटील,गजानन मुंढे,संतोष देवकर,गणेश बकाल,सुपेश सोळंके,अजय खराटे,पवन चरखे,पत्रकार प्रफुल्ल बिचारे,संतोष तायडे,राहुल खंडेराव,अरुण सुरवाडे, व इतर बहुसंख्य शिवभक्त उपस्थित होते.

Previous articleपैशांवर निवडणुका जिंकता आल्या असत्यातर टाटा बिर्ला हे देशाचे पंतप्रधान झाले असते : ना . जयंत पाटील
Next articleसेलू तालुका भा. ज. यु. मोर्चाच्या वतीने आघाडी सरकारचा निषेध करीत शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here