शिवसेना ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा होतांच अकोटमध्ये आनंद उत्सव

 

प्रतिनिधि अशोक भाकरे

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची घोषणा मुंबई येथे होताच अकोट येथे ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क अकोट येथे आनंद उत्सव साजराकरण्यात आला.

महाराष्ट्रातील राजकारणात आज नवा अध्याय सुरू झाला आहे.राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा झाली असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी यांची युतीची घोषणा झाली.

याप्रसंगी अकोट वंचित बहुजन आघाडी व शिवसेना ठाकरे गट यांनी शिवाजी चौक अकोट येथे एकत्रित येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आणि मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.व पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे मा.आमदार संजय गावंडे,उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,तालुका प्रमुख शाम गावंडे,रमेश पाटील खिरकर,मनीष कराळे,नानेश्वर ढोले,वंचीत बहुजन आघाडीचे प्रदीप वानखडे,कांशीराम साबळे,लखन ईगळे,चरण ईगळे,धीरज सिरसाट,दीपक बोडखे,अमन गवई,निलेश झाडे,सिध्देश्वर बेराळ,यांच्यासह शिवसेना ठाकरे गट व वंचीत बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment