शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधानाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कारंजा चौक येथे निषेध आंदोलन

 

सचिन वाघे प्रतिनिधी

हिंगणघाट :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार शुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कारंजा चौक हिंगणघाट येथे आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
राज्यपाल भगतसिंग कोषारी व भाजपा खासदार शुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द बोलल्याबाबद राज्यातील जनता सर्विकडे रोष व्यक्त करत आहे राज्यपालांनी पदाचा राजीनामा द्यावा व तसेच खासदार त्रिवेदी यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी असे व्यक्तव राज्यातील जनतेकडून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द राष्ट्रवादी युवक काँग्रेस कदापी सहन करणार नाही. करीता कारंजा चौक हिंगणघाट येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे घोषणा देत त्यांचा निषेध करण्यात आला..
यावेळी माजी नगरसेवक सौरभ तिमांडे, जिल्हा महासचिव राजू मुडे, जिल्हा उपाध्यक्ष सुशील घोडे, जिल्हा सचिव शेखर ठाकरे, जिल्हा सचिव नितेश नवरखेडे,विध्यार्थी जिल्हाउपाध्यक्ष राहुल जाधव, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष तेजस तडस, उपाध्यक्ष प्रशांत लोणकर,तालुका संघटक आकाश बोरीकर, शहराध्यक्ष पंकज पाके, लिलाधार मडावी,गौरव तिमांडे, पंकज पाराशर, राहुल कोळसे, युवराज माऊस्कर, रितू मोघे, अमोल तडस, हर्षल तपासे, अभिजित लोखंडे, पवन काकडे, दिपाशु ढेगले, आदित्य बुटे, अमित मुळे, जनक पटेल, मो.शाकीब, मनोज हुमाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment