शिव सेनेचे वतीने जिल्हाधिकारी ला निवेदन

 

वर्धा हिंगणघाट मलक नईम

आज दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोज गुरुवारला दुपारी 2:00 वाजता वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख बाळाभाऊ राऊत सह संपर्कप्रमुख रविकांची बालपांडे यांच्या सूचनेनुसार वर्धा जिल्ह्यातील ” शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे”
या पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल भाऊ देवतारे , हिंगणघाट वर्धा जिल्ह्याचे संघटक भारत भाऊ चौधरी , वर्धा जिल्हा उपप्रमुख बाळू मिरापूरकर, हिंगणघाट तालुकाप्रमुख श्री. सतीश धोबे व शहर प्रमुख सतीश ढोमणे ,उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, नगरसेवक मनीष देवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. जिल्हाधिकारी साहेब ,वर्धा तथा मा. पोलीस अधीक्षक साहेब ,वर्धा यांना हिंगणघाट शहरातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा पूर्ववत सुरू करण्यासाठी लागणारा खर्च रूपये:- 07:00 लाख नियोजन समिती मधून मंजूर करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात मा. जिल्हाधिकारी, वर्धा व पोलीस अधीक्षक साहेब ,वर्धा यांना विनंती करण्यात आली की, हिंगणघाट शहरांमध्ये दोन वर्षांपूर्वी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्हा नियोजनामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे शहराच्या मुख्य ठिकाणी लावण्यात आले होते .परंतु मागील एक वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत प्रमुख रस्त्याचे (सिमेंट रस्ता बांधकाम) बांधकाम करण्यात आले. त्यावेळेस त्या कॅमेऱ्याचे केबल बांधकाम विभागाचे ठेकेदार यांच्या हाताने काढण्यात आले होते. तेव्हापासून सदर सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे .नंतर ते केबल पुन्हा लावण्यात आलेले नाही ,पोलीस स्टेशन मधील कंट्रोलिंग यंत्र सुद्धा बंद आहे. शहरातील विविध विषयावर अफवा येतात जसे मुली – मुले चोरीच्या बातम्या तथा गांजा, दारू ज्याचे मोठे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. त्या अनुषंगाने मागील दिनांक 11 ऑक्टोबर 2022 ला आमचे शिष्टमंडळ पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन हिंगणघाट यांना भेट देऊन सदर विषयावर चर्चा करून निवेदन देण्यात आले होते .त्यामधील त्यांनी मुख्य कारण म्हणून आमचे सीसीटीव्ही बंद असल्यामुळे आपल्याला कंट्रोलिंग करता येणे शक्य होत नाही .बंद असलेले यंत्रासाठी खर्च जवळपास 7:00 लाख रुपये एवढा आहे. एवढा निधी पोलीस विभागाकडे उपलब्ध नसल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे .म्हणून आम्ही मा. जिल्हाधिकारी वर्धा यांना विनंती केली की ,आपण नियोजन समिती मधून सदर निधी मंजूर करून द्यावा जेणेकरून सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत सुरू होईल व शहर सुरक्षित होईल,या संदर्भात मा.आमदार श्री अभिजित वंजारी यांना फोन वर सांगितले त्यांनी सुध्दा हा विषय जिल्हा नियोजन समिती च्या बैठकीत घेतो असे म्हटले. अशे असायाचे पत्र त्यांना सुद्धा देण्यात आले आहे. निवेदन देण्याकरिता सेलू तालुका प्रमुख सुनील परिसे, तालुका संघटक नितीन ढगे, वर्धा उप तालुका प्रमुख प्रमोद पांडे, विजय कंगाले, मनोहर नाईक आदि शिवसैनिक उपस्थित होते**.

Leave a Comment