शेगांव,सईबाई मोटे सामान्य रुग्णालयातील कनिष्ठ लिपीकाला ४० हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले लाच लुचपत विभागाची कारवाई

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव .तक्रारदाराचे प्रगती योजनेच्या फरकाचे बिल अदा करण्यासाठी-कनिष्ठ लिपीक,सईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगांव येथे कार्यरत कनिष्ठ लिपिक मंगेश जोशी यास ४० हजाराची लाच घेतांना लाच लुचपत विभाग अमरावती परिक्षेत्र अमरावती यांनी रंगे हात पकडल्याचि घटना दि.७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी घडली

थोडक्यात हकीकत अशि कि यातील तकारदार यांचा आश्वासीत प्रगती योजनेच्या फरकाचे बिल अदा करण्यासाठी कार्यालयीन आदेश तयार करून त्यावर वैदयकीय अधिक्षक यांची सही घेऊन लेखा विभागाकडे पाठविण्यासाठी यातील आलोसे श्री. मंगेश जगन्नाथ जोशी, पद कनिष्ठ लिपीक, नेमणुक सईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगांव, ता.शेगांव, जि. बुलढाणा हे ४० हजार रुपये लाचेची मागणी करित असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा घटकाकडे केली होती.

त्यानुसार दिनांक ०२.११.२०२३ रोजी लाचमागणी पडताळणी कार्यवाही आयोजीत केली असता,लोकसेवक श्री. मंगेश जगन्नाथ जोशी, पद कनिष्ठ लिपीक, नेमणुक सईबाई मोटे सामान्य रुग्णालय,शेगांव यांनी तक्रारदार यांचेकडे ४०हजार रुपये लाच मागणी करून सदर लाच रक्कम तक्रारदार यांच्या नोव्हेंबर महीन्याच्या पगारासोबत बिलाची रक्कम जमा झाल्यानंतर स्वीकारणार असल्याचे सांगीतले.

https://www.suryamarathinews.com/आ-संजय-कुटे-व-उपविभागीय-अध/

त्यानुसार तक्रारदार यांचा नोव्हेंबर महीन्याचा पगार झाल्याने आलोसे यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम घेवुन बोलावल्याने दिनांक ०७.१२.२०२३ रोजी सापळा कारवाई आयोजीत केली असता. आलोसे यांना तक्रारदार यांचेकडुन ४० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे.वृत्त लिहीस्तव याप्रकरणी मंगेश जोशी, कनिष्ठ लिपिक याचे विरुद्ध पोलीस स्टेशन शेगांव शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदर कार्यवाही मा.श्री. मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो,अमरावती परिक्षेत्र अमरावती , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा,मा. श्री. देविदास घेवारे, अप्पर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्रीमती शितल घोगरे, पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, एएसआय श्याम भांगे, पोहेकों,प्रविण बैरागी, पोना, विनोद लोखंडे, जगदीश पवार, मपोकों, रवाती वाणी, चालक नापोकाँ, नितीन शेटे अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांनी पार पाडली.

सत्यमेव जयते शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्यरो बुलडाणा.
कार्यालय दुरध्वनी क्रमांक ०७२६२-२४२५४८ व ९६५७०६६४५५ तसेच टोल फ्रि क्रमांक १०६४
यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांनी केले आहे.buldhananews

Leave a Comment