शेगांव मध्ये शुक्रवारी डिजिटल मिडिया परिषदेच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन.

 

इस्माईल शेखबुलढाणा जिल्हाप्रतिनिधी

बुलढाणा जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन येत्या शुक्रवारी शेगांव येथे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे. तरी बुलढाणा जिल्ह्यातील युट्युब चॅनेल चे व पोर्टलचे संपादक आणि पत्रकार यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अनिल उंबरकार यांनी केले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सरांच्या आदेशानुसार व श्री राजेंद्र काळे राज्य उपाध्यक्ष,श्री अमर राऊत विभागीय सचिव,श्री नितिन सिरसाट प्रदेश प्रतिनिधी,श्री रणजितसिंह राजपूत प्रदेश प्रतिनिधी,श्री चंद्रकांत बर्दे जिल्हाध्यक्ष,श्री अजय बिल्लारी कार्याध्यक्ष,श्री सतिषआप्पा दुडे कार्याध्यक्ष,श्री राजेश चौधरी विभाग संघटक,संदिप शुक्ला जिल्हा सरचिटणीस या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे डिजिटल मिडिया परिषदेच्या पहिल्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी शुक्रवारी दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामभवन, शेगांव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी करण्यात आले.

असून या बैठकीत जिल्ह्यातील विविध तालुका अध्यक्ष पदांच्या निवडी जाहीर केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे हे सर्वांना या बाबतीत आगामी काळातील ध्येय धोरणे आणि काही महत्वपूर्ण सुचना करणार आहेत

.त्यांच्या सोबत डिजिटल मिडिया परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसाठ, जिल्हा कार्याध्यक्ष दिनकर शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष संग्राम धन्वे यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे.तसेच विभागीय अधिस्विकृती समितीवर निवड झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार राजेंद्र काळे,पुरस्कार प्राप्त राजेश चौधरी,शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फहिमभाई देशमुख, सचिव नंदु कुळकर्णी,मावळते अध्यक्ष धनराज ससाने,सचिव दिनेश महाजन यांचा सत्कार आयोजित केलेला आहे.

तरी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये काम करणाऱ्या यु ट्यूब चॅनल व पोर्टल चे संपादक,पत्रकार यांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहनही डिजिटल मीडिया परिषदेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकार यांनी केले आहे.

Leave a Comment